वेदना
लक्षातल्या निमिषान्तही , द्रुश्यान्तही तव चेतना
अवघड्ल्या हास्यात माझ्या, चमकून जाई वेदना...//ध्रु//
जन्मल्या हळव्या क्षणांना कैद ना केले कुणी,
सांगतो सारे मनीचे चेहरा नच धोरणी..
इछ्छिले सगळे मिळावे वेड्या अशी जनरित ना....//१//
आसवेल्हाळ मोर मनात मुक्त नाचतो,
अजुनि डोळ्यान्त रुक्ष नवे गीत वाचतो..
गालांवरती ओघळणारे आज शब्द वाच ना....//२//
गंधिले अनेकदा जे फुल स्वप्नी सुगन्धी,
कोमेजता डोळ्यांत आज उतरून जाई धुंदी...
शोधिले आजन्म किन्तु गंध पुन्हा गवसेचना....//३//
गझल: