वेदना
आनंद पार त्यावरी , ती का बसावी वेदना
येऊन त्या सुखासवे, ही का हसावी वेदना.
का वाटते मला असे, त्यांना फसावी वेदना.
योगीच हा मनातला, की भाव ऐसे सांगतो
वैर्यासही अशी कधी , ही ना डसावी वेदना.
माझाच हात मारतो, त्याची नसावी वेदना.
नाहीतरी तुझ्यासवे, माझे नशीबा फाटले
जातोस जा दुज्याघरी , माझी असावी वेदना.
प्रज्ञा महाजन
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 22/06/2009 - 21:35
Permalink
नाहीतरी तुझ्यासवे... माझे नशीबा फाटले
प्रज्ञाताई,
आपली पहिली प्रकाशित गझल चांगली आहे. मंदाकिनीतील एक गुरू लघू केल्यामुळे जरा लयीत वाचताना गडबड होत आहे खरे. पण आशय व वृत्ताची अचुकता दोन्ही आहे.
नाहीतरी तुझ्यासवे ही ओळ अतिशय आवडली.
अभिनंदन व अजून रचनांची प्रतीक्षा!
वसन्त बन्दे
बुध, 24/06/2009 - 15:26
Permalink
प्रिय
प्रिय प्रज्ञा,
तुझि गझल आवदलि.
लवकरच भेतु
वसन्त मामा
प्रज्ञा महाजन
गुरु, 25/06/2009 - 13:11
Permalink
अतिशय
अतिशय सुंदर रचना. अजून अश्याच चांगल्या गझलांची अपेक्षा.
प्रमोद महाजन
२५-०६-२००९
दशरथयादव
रवि, 05/07/2009 - 14:24
Permalink
छान... दु:खात
छान...
दु:खात मी जुन्याच रे, देतो तिला पत्ते नवे
का वाटते मला असे, त्यांना फसावी वेदना.
प्रसाद लिमये
बुध, 08/07/2009 - 10:40
Permalink
वैर्यासह
वैर्यासही अशी कधी , ही ना डसावी वेदना.
वा वा
अजय अनंत जोशी
सोम, 13/07/2009 - 10:24
Permalink
जातोस जा दुज्याघरी
शेवटचा शेर फारच छान.
फारच छान. शुभेच्छा!
कलोअ चूभूद्याघ्या