प्रवास


संपला प्रवास जरी, साथ सोडू नको
गाठले मुक्काम तरी, वाट मोडू नको

देव जिथे दगडांचे, माणसे असतील कशी
याचनेसाठीही कधी , हाथ जोडू नको

सत्य वेड्या रुचले कुणा, का उगा दाविशी
दोष ना त्यांचा जराही, आरसे फोडू नको

जे जसे होणार होते, ते तसे होणार आहे
प्राक्तनांचे लेख आपुले, तू उगा खोडू नको

दाटला अंधार आहे, दाही दिशांतून दाट
सूर्य उगवेल आता, चांदण्या तोडू नको

गझल: