जाग
झोपले ब्रह्मांड सारे, चांदण्यांना जाग आली
दाटला अंधार आता, सावल्यांना जाग आली
जागुनी हा जन्म सारा पाहिली मी वाट ज्याची,
भंगले ते स्वप्न वेडे, पापण्यांना जाग आली
सांडले कोणी फुलांचे चांदणे वाटेत माझ्या?
रातराणीच्या सुगंधी पाकळ्यांना जाग आली
गर्द काळोखात झाले रान जागे, या मशाली -----
पेटल्या येथे कुणाच्या? काजव्यांना जाग आली
गुंफलेले हात हाती, वर्षल्या प्राणांत स्वाती
तेज मोत्यांचे झळाळे, शिंपल्यांना जाग आली
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
मंगळ, 28/07/2009 - 21:29
Permalink
शिंपल्यांना जाग आली
आदरणीय क्रांती,
ही गझल ( काजव्याच्या शेरात 'तोडावे लागले' हे सोडून ) अप्रतिम गझल आहे.
मनापासून शुभेच्छा!
( सरप्राइझिंग - एकही रिप्लाय नाही. असो. गझल उत्तम आहे.)
शगुन
बुध, 29/07/2009 - 10:35
Permalink
खुपच छान
जागुनी हा जन्म सारा पाहिली मी वाट ज्याची,
भंगले ते स्वप्न वेडे, पापण्यांना जाग आली
चित्तरंजन भट
शुक्र, 31/07/2009 - 13:12
Permalink
काजव्यांन
काजव्यांना जाग आली आवडले. सांडले कोणी फुलांचे चांदणे वाटेत माझ्या? ही ओळही. एकंदर छान.
दशरथयादव
शुक्र, 31/07/2009 - 14:58
Permalink
क्रान्ती, ठ
क्रान्ती,
ठीक आहे..
सांडले कोणी फुलांचे चांदणे वाटेत माझ्या?
रातराणीच्या सुगंधी पाकळ्यांना जाग आली
खलिश
शुक्र, 31/07/2009 - 19:34
Permalink
नमस्कार, गझ
नमस्कार,
गझल छान आ हे.
खालील शे र विशेष आवडले.....
*
झोपले ब्रह्मांड सारे, चांदण्यांना जाग आली
दाटला अंधार आता, सावल्यांना जाग आली
गुंफलेले हात हाती, वर्षल्या प्राणांत स्वाती
तेज मोत्यांचे झळाळे, शिंपल्यांना जाग आली
सांडले कोणी फुलांचे चांदणे वाटेत माझ्या?
रातराणीच्या सुगंधी पाकळ्यांना जाग आली
*
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / ३१-०७-२००९.