गजल

जीवनाच्या गाभार्‍यात,
सुर वाजती भक्तीचे,
मन्द तेवणे समईचे,
दरवळ्णे अगरबत्तीचे,
वास्तव्य लक्श्मीचे.
जीवनाच्या परिसरात,
व्रुन्दावन उभे तुळ्शीचे,
डेरेदार गुच्छ फुलान्चे,
ट्पोरे थेम्ब दवान्चे,
जीवनाच्या वाटेवर,
रेशमी शब्दान्चे गालीचे,
पान्ढरे शुभ्र शिम्पण प्राजक्ताचे,
सुगन्धी फवारे अत्तराचे.
जीवनाच्या गाण्यात ,
शब्द-सुरान्चा मिलाप,
सुख-दुखान्चा  आलाप,
सन्गीताचा सुरेल साज,
तृप्त होती कान आज.

गझल: