उभा ज् न्म गेला
उभा जन्म गेला जगने शिकाया
विसरुन गेलो त्यात जगाया
मृगाक्षि तुझे प्रेमहि मृगजळाचे
फसल्यावरि लागले हे कळाया
नसे मालमत्ता देव इतकेच म्हटले
पाखंडी मज लागले जग म्हणाया
उगा हसण्यावारि आयुष्य नेले
आता रोज रडतो एकदाच हसाया
कसे उलटे पडले नशिबाचे फासे
न खेळता लागलो मि हराया
पुढे काय घडणार ठाऊक नव्हते
तरि मारल्या रोज कैक बढाया
गझल: