सारे तुझ्यात आहे
माझी ही गझल माझ्या "सारे तुझ्यात आहे" ह्या अल्बम मधली आहे. अभिजीत राणे ह्यांचं संगीत दिग्दर्शन आणि स्वप्निल बांदोडकरांचा आवाज. ही गझल इथे ऐकता येईल.
http://maanbindu.com/showMusic.do?field=sangeet&name=Sare-Tuzyat-Aahe
आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे
तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे
ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे
स्वीकारुनी गुलामी बेचैन रात आहे
चंद्रात आज माझ्या ही खास बात आहे
संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी
केसात माळलेल्या या मोगर्यात आहे
ही आग मारव्याची ह्या गारव्यात आहे
गाफ़ील यौवनाची संपूर्ण मात आहे
जयश्री अंबासकर
गझल:
प्रतिसाद
क्रान्ति
बुध, 10/06/2009 - 22:00
Permalink
खास!
गझल खूप मस्त आहे. दिलेरी, मोगरा हे शेर अगदीच विशेष. संगीताच्या साथीने अजूनच खुललीय.
क्रान्ति {रोज एकदा असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
शांत्सुत
शुक्र, 12/06/2009 - 13:59
Permalink
ह्या
ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे
वा.......
भूषण कटककर
शनि, 13/06/2009 - 00:46
Permalink
म्हणजे
संगीत दिग्दर्शकांना व गायकांना चुकलेले कवाफी चालतात तर!
Dhananjay Borde
रवि, 14/06/2009 - 22:04
Permalink
मुशी
मुशी ? please, explain and elaborate.
शांत्सुत
बुध, 17/06/2009 - 16:50
Permalink
व्वा! क्या
व्वा!
क्या बा त है !
तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे
शांत्सुत,
एक आनंद यात्री ..
दशरथयादव
रवि, 05/07/2009 - 14:18
Permalink
छान..... तेजा
छान.....
तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे
ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे
स्वीकारुनी गुलामी बेचैन रात आहे
चंद्रात आज माझ्या ही खास बात आहे
संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी
केसात माळलेल्या या मोगर्यात आहे