रे जीवना...
वेडास माझ्या या अता कोणीच भाळत नाही,
सुक्या फुलास तसे कधी कोणीच माळत नाही
गेल्या ऋतूने जाळले घर, ती धरा भिजताना,
तो पावसाळा अजुन हा शेजार मोडत नाही
थेंबातुनी नित्य झिरपावे सागरी 'सल' माझे,
'ते' वाहते ती झींग या गगनात मावत नाही!
ते टाळणे तेव्हा तुझे, हेच तर सांगत होते,
"आता, तुला-मी नी मला-तू खास शोभत नाही!"
रे जीवना, हे शाप की उपकार? सांगावे तू!
तुर्तास, याचे मी दुकान उगीच थाटत नाही
-निलेश
गझल: