मैफल

जगणे माझे कसे, उमगले मला आज रे
क्षणाक्षणाचे मरणे करते हसुन साजरे

सुखमय आयुष्याचे फसवे देखावे ते
डामडौल तो पोकळ छळतो पुन्हा आज रे

भेसुर वास्तव कुरतडते या मुक्या मनाला
या दुखण्याला नाहि उतारा, ना इलाज रे

नुसती घुसमट, रडणे, कुढणे अन तडफडणे
अस्तित्वाची माझ्या वाटे मला लाज रे

गुन्हा न ठाउक तरी भोगणे जन्मठेप ही
श्वास पहार्‍यामधले, केवळ नाइलाज रे

संपव मैफल रंगहीन अन केविलवाणी
जीवनगाणे बेसुर झाले, तुटे साज रे

गझल: 

प्रतिसाद

शेर आवडला
नुसती घुसमट, रडणे, कुढणे अन तडफडणे
अस्तित्वाची माझ्या वाटे मला लाज रे