सत्य
संबंध जोडुनीया पेचांत अडकलेले
जवळून पाहिले मी काही दुरावलेले
आश्चर्य वाटले की हृदयांस ना उमगले
झटकून टाकलेले होते स्थिरावलेले
समजून रीत घ्या हो.. अंती जगात असती
पहिले प्रकाश देता दुसरे प्रकाशलेले
पाहून रिक्त नजरा माझे मला समजले
इतके मला कुणीही नव्हते चितारलेले
आहे प्रकाश ज्याचा राहील तोच अंती
विरतील चंद्र सारे एकेक माळलेले
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
रवि, 02/08/2009 - 10:18
Permalink
विरतील चंद्र सारे एकेक माळलेले
जवळून पाहिले मी काही दुरावलेले
व
पहिले प्रकाश देता दुसरे प्रकाशलेले - हे दोन शेर आवडले.
झटकून टाकलेले होते स्थिरावलेले हाही छान!
एक चांगली गझल!
यावरून आठवले:
कल जो तनके चलते थे अपनी शान-ओ-शौकतपर
शम्मातक नही जलती आज उनकी तुर्बतपर
( चढता सुरज मधील ओळी!)
अजय अनंत जोशी
सोम, 03/08/2009 - 20:41
Permalink
धन्यवाद!
गझल पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल (व्यक्त केल्याबद्दल) धन्यवाद!
मला आवडलेल्या ओळी
आहे प्रकाश ज्याचा राहील तोच अंती
विरतील चंद्र सारे एकेक माळलेले
कलोअ
चूभूद्याघ्या