अर्थ
सांगून अर्थ सारे तुजला कळे न काही
कळले कसेबसे... जे वळले असे न काही
एकाच बंधनाने बधलो जरूर होतो
जाळून हृदय माझे, जळले तुझे न काही
जखमा अनेक होत्या फांदीवरी फुलांच्या
तोडून वृक्ष, जखमा पुसल्या असे न काही
मिळवून लाख रत्ने गुर्मीत वर्ष गेली
तो एक दिवस येता माझे उरे न काही
'गंगेस प्राप्त झालो' सागर म्हणे शिवाला,
'आता तुझेच सारे, मी ठेवले न काही'
दीपावलीत जेंव्हा विझतील चांदण्याही
मागा प्रकाश माझा, सृष्टी भरेन काही
जाणीव होत माझी तृष्णा मिटे न काही
ओतून 'अर्थ' उपरे पेला भरे न काही
गझल:
प्रतिसाद
मानस६
बुध, 20/05/2009 - 21:33
Permalink
मिळवून लाख
मिळवून लाख रत्ने गुर्मीत वर्ष गेली
तो एक दिवस येता माझे उरे न काही
'गंगेस प्राप्त झालो' सागर म्हणे शिवाला,
'आता तुझेच सारे, मी ठेवले न काही'
दीपावलीत जेंव्हा विझतील चांदण्याही
मागा प्रकाश माझा, सृष्टी भरेन काही! वा वा हे शेर आवडलेत
-मानस६
अजय अनंत जोशी
गुरु, 21/05/2009 - 21:34
Permalink
धन्यवाद
धन्यवाद मानस६. हे मलाही आवडलेले आहेत.
कलोअ चूभूद्याघ्या
अजय अनंत जोशी
गुरु, 21/05/2009 - 21:35
Permalink
एक बदल
एकाच बंधनाने विणलो जरूर होतो
जाळून हृदय माझे, जळले तुझे न काही
हा बदल कसा वाटतो?
कलोअ चूभूद्याघ्या