रात्र आधी मोजतो
रात्र आधी मोजतो
स्वप्न मग मी बेततो
श्वास थोडे मोडुनी
दिवस नगदी आणतो
ओळखी झाल्या शिळ्या
नजर ताजी शोधतो
एक ना तारा नभी
आणि चकवा भेटतो
सांगणे होते कुठे?
शब्द ओठी कांपतो
विकत मिळते सावली!
कोण झाडे लावतो?
सोडले ते घर तिने?
दार उघडे पाहतो!
_______________________________
जयन्ता५२
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
मंगळ, 19/05/2009 - 16:09
Permalink
छान.
नेहमीप्रमाणेच छोट्या बहरेतील उत्तम गझल आहे.
हे शेर आवडले-
रात्र आधी मोजतो
स्वप्न मग मी बेततो
ओळखी झाल्या शिळ्या
नजर ताजी शोधतो
विकत मिळते सावली!
कोण झाडे लावतो?
काही शंका आहेत-
एक ना तारा नभी
आणि चकवा भेटतो..
हा शेर नीट कळला नाही.
सांगणे होते कुठे?
शब्द ओठी कांपतो
"कंपतो" हवे का?
क्रान्ति
बुध, 20/05/2009 - 08:40
Permalink
आवडली.
पूर्ण गझल आवडली. खास शेर
विकत मिळते सावली!
कोण झाडे लावतो?
सोडले ते घर तिने?
दार उघडे पाहतो!क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
भूषण कटककर
रवि, 02/08/2009 - 10:26
Permalink
पहिले दोन शेर व सावली
हे शेर फार आवडले.
सावलीचा शेर तर सुंदरच आहे.
शब्द ओठी कापतो वरून वसीम बरेलवीचे
आते आते मेरा नामसा रह गया
उसके होठोंपे कुछ कापता रह गया - आठवले.