हे शहर माझी व्यथा सांभाळते
मौन माझ्या सोबतीने पाळते
हे शहर माझी व्यथा सांभाळते
ती उखाणा घेत नाही, हासते
हासुनी ती नाव माझे टाळते
मी तिची नि:शब्दताही ऐकतो
पत्र ती घाईत माझे चाळते
लोपले पावित्र्य दीपांचे, पहा!
देशद्रोह्यांना प्रजा ओवाळते
पोळलो मी, भाजलो आजन्म मी
ही चिता आहे बरी की ,जाळते
दु:ख ओलांडून जाती माणसे
कोण येथे व्यर्थ अश्रू ढाळते?
रात्र भासे ही मला तुजसारखी
चांदणे वेणीत जेव्हा माळते
गझल:
प्रतिसाद
मानस६
रवि, 03/05/2009 - 01:13
Permalink
मी तिची नि:शब्दताही ऐकतो
मी तिची नि:शब्दताही ऐकतो
पत्र ती घाईत माझे चाळते.. वा
दु:ख ओलांडून जाती माणसे
कोण येथे व्यर्थ अश्रू ढाळते?
पोळलो मी, भाजलो आजन्म मी
ही चिता आहे बरी की ,जाळते.. वा वा.. बहोत बढिया,, अतिशय साध्या शब्दातून आलेला तगडा आशय!
चांदणे वेणीत जेव्हा माळते..वा
-मानस६
ज्ञानेश.
सोम, 04/05/2009 - 12:38
Permalink
सुंदर
मतला, मक्ता आणि हा शेर आवडला-
मी तिची नि:शब्दताही ऐकतो
पत्र ती घाईत माझे चाळते
शुभेच्छा.
प्रसन्न शेंबेकर
मंगळ, 05/05/2009 - 17:33
Permalink
धन्यवाद
धन्यवाद मानस व ज्ञानेश!
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"
अजय अनंत जोशी
बुध, 06/05/2009 - 12:10
Permalink
कोण येथे व्यर्थ अश्रू ढाळते?
ती उखाणा घेत नाही, हासते
हासुनी ती नाव माझे टाळते
कोण येथे व्यर्थ अश्रू ढाळते?
व्वा!
कलोअ चूभूद्याघ्या
दशरथयादव
गुरु, 07/05/2009 - 17:47
Permalink
भन्नाट्..आव
भन्नाट्..आवड्ली
ती उखाणा घेत नाही, हासते
हासुनी ती नाव माझे टाळते
मी तिची नि:शब्दताही ऐकतो
पत्र ती घाईत माझे चाळते
लोपले पावित्र्य दीपांचे, पहा!
देशद्रोह्यांना प्रजा ओवाळते
आनंदयात्री
रवि, 10/05/2009 - 13:11
Permalink
"दु:ख
"दु:ख ओलांडून जाती माणसे"
सुंदर कल्पना...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!
चक्रपाणि
सोम, 11/05/2009 - 23:27
Permalink
फारच छान
दीपांचे पावित्र्य लोपणे, दु:ख ओलांडून जाणे या कल्पना आवडल्या. पत्र घाईत चाळणे वगैरेही छान उतरले आहे. एकंदर गझल आवडली.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
चित्तरंजन भट
बुध, 13/05/2009 - 11:24
Permalink
वेणीत चांदणे माळणारी रात्र
वा, प्रसन्न. वेणीत चांदणे माळणारी रात्र, निःशब्दता ऐकणे, दुःख ओलांडून जाणारी माणसे विशेष आवडली. फार छान.
प्रसन्न शेंबेकर
गुरु, 14/05/2009 - 10:25
Permalink
अजय, दशरथ,
अजय, दशरथ, आनंदयात्री, चक्रपाणी , चितरंजन ... धन्यवाद!
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"
पुलस्ति
गुरु, 14/05/2009 - 16:16
Permalink
वा वा!
दुसर्या, तिसर्या वाचनात आणखी आणखी आवडली!
शेवटचे २ शेर तर विशेष!
दु:ख ओलांडून जाती माणसे
कोण येथे व्यर्थ अश्रू ढाळते? --- वा वा वा!
प्रसन्न शेंबेकर
शुक्र, 15/05/2009 - 09:48
Permalink
धन्यवाद
धन्यवाद पुलस्ती. .
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"