जा मुक्त तू

जा मुक्त तू साऱया जुन्या शपथातुनी
जा मुक्त तू साऱ्या नव्या वचनातुनी


माझ्यातुनी केले वजा आहे तुला
शून्यात आलो परतुनी शून्यातुनी


आता तुझे तर मौनही झाले घुमे
अन मागतो मी उत्तरे शब्दातुनी


जाताच तू विझले कसे सारे दिवे?
अन दाटला अंधार हा प्राणातुनी?


भोगीन मी साऱ्या सजा, पण सांग की
अपराध तो केला कुणी दोघातुनी?   


(जयन्ता५२)

गझल: 

प्रतिसाद

जा मुक्त तू साऱया जुन्या शपथातुनी
जा मुक्त तू साऱ्या नव्या वचनातुनी
छान...
माझ्यातुनी केले वजा आहे तुला
शून्यात आलो परतुनी शून्यातुनी
- वा...दुसरी  ओळ  उत्तमच...

आता तुझे तर मौनही झाले घुमे
अन मागतो मी उत्तरे शब्दातुनी
छान...बोलक्या मौनासारखेच घुमे मौन ! सुंदर...

हे  शेर फार आवडले. शुभेच्छा

सगळेच  शेर  सुंदर  आलेत.
माझ्यातुनी केले वजा आहे तुला
शून्यात आलो परतुनी शून्यातुनी

आता तुझे तर मौनही झाले घुमे
अन मागतो मी उत्तरे शब्दातुनी

हे  तर  फारच  सुरेख.. 'घुमे' मौन. व्वा!

गझल आवडली.
सोनाली

शून्यात आलो परतुनी शून्यातुनी
कलोअ चूभूद्याघ्या