बिलगून रात्र गेली.

उधळून तुझ्यावरी रे, बहरून रात्र गेली,
उठवून उरात वणवा, विझवून रात्र गेली.

चाले हितगूज रे रोज तुझ्याच आठवांशी,
हे वेड जुनेच माझे, उमजून रात्र गेली.

तू सांग कसे हसू मी? मदधुंद या क्षणांशी,
जे घाव दिलेस वर्मी, उगळून रात्र गेली.

झाली इतुकी तुझी रे, मज सवय नीजताना,
शापीत तुझ्याविना मी, ठरवून रात्र गेली.

लागे मजला न चाहूल, मधाळ चांदण्याची,
नसतोस कुशीत जेव्हा, बदलून रात्र गेली.

गेले समजून तेव्हा, सुटणार वाद नाही,
आता रुसवा कसा रे? मिटवून रात्र गेली.

माझे न कुणीच येथे, अवकाश, तारकाही,
का? रे मग काळजाला, बिलगून रात्र गेली.


गझल: 

प्रतिसाद

नेहमीच्या केव्हातरी पहाटे च्या वृत्तासारखे हे वृत्त सहज वाटत नाही. थोडे प्रयत्नपूर्वक केल्यासारखे वाटते. गझल सहज गुणगुण्यासारखी असल्यास फार बरे वाटते.

भन्नाट गझल...चान्दणी 
चाले हितगूज रे रोज तुझ्याच आठवांशी,
हे वेड जुनेच माझे, उमजून रात्र गेली.

तू सांग कसे हसू मी? मदधुंद या क्षणांशी,
जे घाव दिलेस वर्मी, उगळून रात्र गेली.
लागे मजला न चाहूल, मधाळ चांदण्याची,
नसतोस कुशीत जेव्हा, बदलून रात्र गेली.

गेले समजून तेव्हा, सुटणार वाद नाही,
आता रुसवा कसा रे? मिटवून रात्र गेली.

चित्तरन्जनशी सहमत.
माझे न कुणीच येथे, अवकाश, तारकाही,
का? रे मग काळजाला, बिलगून रात्र गेली.
हे आवडले.
कलोअ चूभूद्याघ्या