नको ...
हृदयांस तुझ्या रे नको बदलवू आता
बदलून जगाला नको बिघडवू आता
प्रेमाचा साबण लावुन चमक जरा तू
बुडबुडेच नुसते नको पसरवू आता
मी पत्थर आहे, पत्थर म्हणून जगतो
शेंदूर लावुनी नकोस चिडवू आता
भूमीत उतरता सीता म्हणते, 'रामा ! -
नजरेतुन अपुल्या नको उतरवू आता'
उत्तरे जयाची तुलाच कापत गेली
ते प्रश्न जगाचे नको सोडवू आता
मी घेतो कुठली शाळा जरा अताशा
मजसाठी पदवी नको मागवू आता
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 07/04/2009 - 23:56
Permalink
मी पत्थर आहे
मी पत्थर आहे, पत्थर म्हणून जगतो
शेंदूर लावुनी नकोस चिडवू आता
वा...
दशरथयादव
गुरु, 09/04/2009 - 20:42
Permalink
छान......... उत्
छान.........
उत्तरे जयाची तुलाच कापत गेली
ते प्रश्न जगाचे नको सोडवू आता
अजय अनंत जोशी
शुक्र, 10/04/2009 - 07:54
Permalink
धन्यवाद
चित्तरंजन, दशरथयादव मनापासून धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या
ऋत्विक फाटक
सोम, 13/04/2009 - 14:21
Permalink
प्रेमाचा साबण
प्रेमाचा साबण लावुन चमक जरा तू
बुडबुडेच नुसते नको पसरवू आता
व्वा! प्रेमाचा साबण!
ही उपमा कालिदासालाही लाजवणारी आहे!
अजय अनंत जोशी
बुध, 06/05/2009 - 12:07
Permalink
बापरे!
व्वा! प्रेमाचा साबण!
ही उपमा कालिदासालाही लाजवणारी आहे!
ऋत्विक,
आधीच मी जीव मुठीत धरून आहे. त्यात हे म्हणजे.....
या ओळी आवडल्याबद्दल धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या
चांदणी लाड.
मंगळ, 12/05/2009 - 16:32
Permalink
नजरेतुन अपुल्या
मी पत्थर आहे, पत्थर म्हणून जगतो
शेंदूर लावुनी नकोस चिडवू आता (वाह..!!)
भूमीत उतरता सीता म्हणते, 'रामा ! -
नजरेतुन अपुल्या नको उतरवू आता' (घायाळ....)
उत्तरे जयाची तुलाच कापत गेली
ते प्रश्न जगाचे नको सोडवू आता (१०० % पटला हा शेर..)
क्रान्ति
बुध, 13/05/2009 - 00:07
Permalink
खास!
भूमीत उतरता सीता म्हणते, 'रामा ! -
नजरेतुन अपुल्या नको उतरवू आता'
खूप आवडलेला शेर.
उत्तम गझल!