तू दिलेल्या वेदना
तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही
पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही
भोगण्याचा शाप आहे नंदिनीला
आजही का आग प्रतिकारात नाही
जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही
उंबर्याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही
का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही
जयश्री
गझल:
प्रतिसाद
विजय तलाठी (not verified)
गुरु, 02/04/2009 - 03:02
Permalink
सुंदर
उंबर्याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही
ज्ञानेश.
गुरु, 02/04/2009 - 11:39
Permalink
सुरेख..
सुरेख गझल आहे.
हे शेर आवडले-
तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही
क्या बात है!
पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही
जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही..
हे दोन्ही शेर भटांच्या शैलीची आठवण करून देतात.
उंबर्याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही
हा ही छान.
एकूणात गझल मस्तच.
दशरथयादव
गुरु, 02/04/2009 - 15:44
Permalink
भन्नाट्...ग
भन्नाट्...गझल
पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही
भोगण्याचा शाप आहे नंदिनीला
आजही का आग प्रतिकारात नाही
जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही
उंबर्याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही
का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही
क्रान्ति (not verified)
रवि, 05/04/2009 - 21:03
Permalink
खास गझल
जयुताई, खास खास गझल! सगळेच शेर एकापेक्षा एक कमाल आहेत.
जयश्री अंबासकर
सोम, 06/04/2009 - 14:36
Permalink
धन्यवाद !!
ज्ञानेश, दशरथ....... मनापासून धन्यवाद !!
चित्तरंजन भट
सोम, 06/04/2009 - 17:52
Permalink
छान
ती नशा लाचार या जगण्यात नाही
छान आहे हं गझल. अजून बारीक काम करता येईल का ते बघावे असे सांगावेसे वाटते.
अजय अनंत जोशी
मंगळ, 07/04/2009 - 16:25
Permalink
आज पुरते दु:ख
का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही
व्वा!
कलोअ चूभूद्याघ्या
चांदणी लाड.
सोम, 13/04/2009 - 15:06
Permalink
आज पुरते दु:ख ही पदरात नाही.
छान गझल.
का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही (हा शेर खास आवडला.)
जयश्री अंबासकर
शनि, 25/04/2009 - 19:27
Permalink
पुन्हा
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद :)
चित्त..... नक्की प्रयत्न करेन. आपलं मार्गदर्शन असंच मिळावं.
वैभव देशमुख
शनि, 25/04/2009 - 19:49
Permalink
आज पुरते दुख्ख ......
सुन्दर गझल....
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंगळ, 28/04/2009 - 18:30
Permalink
मस्त !
उंबर्याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही
क्या बात है !
गझल आवडली !