शहारा

पळणे इतके मुरून गेले
जरा थांबता... थकून गेले


गप्पा रंगत आल्या अन मी -
कशी अचानक उठून गेले?


मनात डोकावले; दचकले
किती किडे वळवळून गेले!


अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले


जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू सावरून गेले...


कुणीच हल्ली मला म्हणेना
"काम तुझ्याविन अडून गेले"


आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?


हा देहाचा सुंभ राहिला
पीळ मनाचे जळून गेले!


श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?

गझल: 

प्रतिसाद

वा. मस्त  शेर  आहेत  सगळेच.
अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले
कुणीच हल्ली मला म्हणेना
"काम तुझ्याविन अडून गेले"
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
हा देहाचा सुंभ राहिला
पीळ मनाचे जळून गेले..!
काही  शेरांत 'गेले' या  क्रियापदामुळे  गझल  स्त्री च्या  भूमिकेतून  असल्याचे  जाणवते.
हे  विशेष  आहे.
पुलस्ति  यांचे  अभिनंदन! 

आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
छान कल्पना!
मनात डोकावले; दचकले
किती किडे वळवळून गेले!
हाही आवडला..
अभिनंदन!
 

छान...
हा देहाचा सुंभ राहिला
पीळ मनाचे जळून गेले!
श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?

प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू सावरून गेले...
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
हा देहाचा सुंभ राहिला
पीळ मनाचे जळून गेले!
श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?
आवडली गझल, तरीही हे शेर मनाला भिडून गेले. :)

अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले
कलोअ चूभूद्याघ्या

मी  आज ही साईट पाहिली, तु़झ्या सर्व ग़झला खुपच आवडल्या  मला.
पळणे इतके मुरून गेले
जरा थांबता... थकून गेले
गप्पा रंगत आल्या अन मी -
कशी अचानक उठून गेले?
आणि
जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू सावरून गेले...
कुणीच हल्ली मला म्हणेना
"काम तुझ्याविन अडून गेले"
मस्तच दादा.