काही स्वगते...
श्वापदांचे ना मुळी ते माणसांचे काम होते
सांडले मी रक्त भरले सोयर्यांनी जाम होते
जाळतांना काल काही मातलेल्या आठवांना
पेटलेल्या आसवांचे मोजले मी दाम होते
ना तिथे बाजार होता ना तिथे होती दलाली
भक्त होता 'तोच' त्याचा 'तोच' त्याचे धाम होते
शोधतो मी सांजवेळी हासर्या त्या माणसांना
गाव ज्यांचे बाटके अन नावही बदनाम होते
चांदण्यांच्या सावल्यांना स्वप्न पडले एक वेडे
झाकला मग सूर्य त्यांनी छेडले संग्राम होते
'वेचले' आयुष्य सारे वादळांशी झुंजतांना
गुंफतांना लक्तरेही ना तसे विश्राम होते
चालल्या 'सेना' बघा या तारण्याला धर्म खोटा
माकडांचे संघ ते, ना त्यात उरले 'राम' होते
गझल:
प्रतिसाद
दशरथयादव
मंगळ, 24/03/2009 - 14:20
Permalink
छान्...शेर श
छान्...शेर
शोधतो मी सांजवेळी हासर्या त्या माणसांना
गाव ज्यांचे बाटके अन नावही बदनाम होते
चांदण्यांच्या सावल्यांना स्वप्न पडले एक वेडे
झाकला मग सूर्य त्यांनी छेडले संग्राम होते
व्योम
मंगळ, 14/04/2009 - 01:19
Permalink
धन्यवाद
अभिप्रायाबद्दल धन्यवाद दशरथ.
मी अजून गझल लिहिणे शिकतोच आहे. जाणकारांचे मार्गदर्शन लाभावे ही इच्छा.
अजय अनंत जोशी
गुरु, 16/04/2009 - 22:05
Permalink
सॉलीड
श्वापदांचे ना मुळी ते माणसांचे काम होते
सांडले मी रक्त भरले सोयर्यांनी जाम होते
जाळतांना काल काही मातलेल्या आठवांना
पेटलेल्या आसवांचे मोजले मी दाम होते
कलोअ चूभूद्याघ्या
व्योम
शुक्र, 17/04/2009 - 02:12
Permalink
धन्यवाद
धन्यवाद अजय !!