कैक मतले...
कैक मतले ...फक्त पडलेले!
काफिये...का सर्व अडलेले?!
रोज गगनाची मला पृच्छा.,
"काय तव पंखात दडलेले..?!"
सूर्य संध्येला असा भासे..,
की क्षितीजी रत्न जडलेले!
बांध तोरण जर्द पानांचे..,
रे वसंता...बहर झडलेले!
घुंगरू आले नशीबी अन,
पाय मग हे खूप रडलेले!
का अजूनी शिखर गवसेना..?
पाय तर वेगात पडलेले..?!
सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!
-मानस६
गझल:
प्रतिसाद
दशरथयादव
रवि, 22/03/2009 - 17:16
Permalink
दोन शेर
दोन शेर आवडले
का अजूनी शिखर गवसेना..?
पाय तर वेगात पडलेले..?!
सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!
अनंत ढवळे
रवि, 22/03/2009 - 21:00
Permalink
चित्रात्मक !
सूर्य संध्येला असा भासे..,
की क्षितीजी रत्न जडलेले!
बांध तोरण जर्द पानांचे..,
रे वसंता...बहर झडलेले!
सुंदर शेर, अतिशय चित्रात्मक !
श्रीनिवास
सोम, 23/03/2009 - 19:03
Permalink
आवडली
मलाही शिंपल्यांचा शेर आवडला.
ज्ञानेश.
सोम, 23/03/2009 - 19:33
Permalink
वा..
सुरेख गझल. हे शेर भिडले-
रोज गगनाची मला पृच्छा.,
"काय तव पंखात दडलेले..?!"
सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!
विजय तलाठी (not verified)
गुरु, 02/04/2009 - 03:03
Permalink
अप्रतीम
कैक मतले ...फक्त पडलेले!
काफिये...का सर्व अडलेले?!
रोज गगनाची मला पृच्छा.,
"काय तव पंखात दडलेले..?!"
सूर्य संध्येला असा भासे..,
की क्षितीजी रत्न जडलेले!
बांध तोरण जर्द पानांचे..,
रे वसंता...बहर झडलेले!
घुंगरू आले नशीबी अन,
पाय मग हे खूप रडलेले!
का अजूनी शिखर गवसेना..?
पाय तर वेगात पडलेले..?!
सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!
अप्रतीम. ..
अजय अनंत जोशी
मंगळ, 07/04/2009 - 16:37
Permalink
शिंपल्यांच्या आत..
सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!
कलोअ चूभूद्याघ्या
चित्तरंजन भट
मंगळ, 07/04/2009 - 17:16
Permalink
छान गझल
सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!
वाव्वाव्वा! एकंदर छान गझल.