बातमी
दाटुनी आलो जरी नव्हतो मुळी बरसायला
उगवलो होतो तरी होतो कुठे बहरायला?
वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा
सोबती कोणीच नसता जीव हा रमवायला
शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
लोक काठी बसुन माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
सोंग आहे रोजचे - सार्यांस ऐसे वाटले
फक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला
भेटलो बागेत अवचित, चार होत्या चांदण्या
बातमी झाली चवीची - लागली पसरायला!
वार तू केलास आणि दरवळाया लागलो
श्वास मागाहून माझे लागले उसवायला
गझल:
प्रतिसाद
दशरथयादव
रवि, 22/03/2009 - 17:12
Permalink
भन्नाट
भन्नाट गझल....व्वा..
लोक काठी बसुन माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
सोंग आहे रोजचे - सार्यांस ऐसे वाटले
फक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला
भेटलो बागेत अवचित, चार होत्या चांदण्या
बातमी झाली चवीची - लागली पसरायला!
चित्तरंजन भट
शुक्र, 10/04/2009 - 14:00
Permalink
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
वाव्वा. फार सहज.
........
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
वाव्वाव्वा... गझल एकंदर छान आहे.
शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
जरा कानांना खटकतं. माझ्याहून माझे शब्द तुला अधिक खातरीचे वाटले असे म्हणायचे असल्यास
शब्द माझ्याहून माझे खातरीचे वाटले असे केल्यास कसे?
पुलस्ति
शुक्र, 10/04/2009 - 17:52
Permalink
मस्त
भाव, सोंग आणि सारवासारव हे शेर फारच मस्त!!
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला? / फक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला
... वा वा! छानच मिसरे.
प्रदीप कुलकर्णी
शुक्र, 10/04/2009 - 18:25
Permalink
सुरेख...
दाटुनी आलो जरी नव्हतो मुळी बरसायला
उगवलो होतो तरी होतो कुठे बहरायला?
- उत्तम कल्पना; पण संदिग्ध. विशेषतः दुसरी ओळ.
[(मी उगवून तर आलो खरा; पण बहरण्यापर्यंत टिकलोच नाही...त्याआधीच नष्ट झालो, असे म्हणायचे असणार...पण हे पहिल्या वाचनात समजत नाही. (ओळीत एकच शब्द (होतो) दोनदा आल्याने असे झाले आहे)]. पहिल्या वाचनात काही गोष्टी स्पष्ट झाल्या की त्यापुढच्या वाचनात गझल वाचण्यातील, आकलनातील आनंद द्विगुणित होतो.
वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा
सोबती कोणीच नसता जीव हा रमवायला
- छान. सूक्ष्म भावदर्शन. तिरकसपणाही जाणवतो.
शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला
- फारच छान. सुरेख. (अर्थ आणि भाव तोच ठेवून हा शेर आणखी सफाईदार करता आला असता.)
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
- अप्रतिम.
लोक काठी बसुन माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
- चांगली कल्पना. (अगदी अपरिहार्य असेल तर आणि तरच दीर्घचे ऱ्हस्व आणि ऱ्हस्वचे दीर्घ करावे.)
सोंग आहे रोजचे - सार्यांस ऐसे वाटले
फक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला
- छान.
भेटलो बागेत अवचित, चार होत्या चांदण्या
बातमी झाली चवीची - लागली पसरायला!
- :) चांदण्या !
काहीसा मिश्किल, काहीसा लटका राग...चांगला जमून आला आहे शेर.
[(माझ्या मनात जो अर्थ आहे, तोच तुमच्या मनात असेल तर, या `चांदण्या` दुपारच्या निवांत वेळी - स्वयंपाकघरातील झाकपाक झाल्यावर- पूर्वीच्या काळी ओटीवर, ओट्यावर, ओवरीत, अंगणात, {आताच्या काळात कुठे ते माहीत नाही... कदाचित बागेत ! :) } असा कुठला चटकमटक विषय चघळत बसतात, तेव्हा त्या चांदण्यांना साळकाया-माळकाया असेही म्हटले जाते !]
वार तू केलास आणि दरवळाया लागलो
श्वास मागाहून माझे लागले उसवायला
- हा शेर कळला नाही.
...........................
एखाद-दुसरा शेर सोडल्यास अगदी सफाईदार झाली आहे गझल. अभिनंदन आणि पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा.
अगदी साध्या साध्या विषयांचेही उत्तमोत्तम शेर होत असतात, हे ध्यानी ठेवून भरपूर लिहावे. लिहिताना स्वतःशी प्रामाणिक, सच्चे असावे. (हे तुम्हाला उद्देशून नसून, लिहिता लिहिता सहजच लक्षात आलेला मुद्दा नमूद करून ठेवीत आहे, इतकेच.)
पुढील गझलेची वाट पाहत आहे.
आनंदयात्री
शनि, 11/04/2009 - 13:07
Permalink
धन्यवाद
चित्तसाहेब, पुलस्ति, दशरथजी आणि प्रदीपजी
मनापासून धन्यवाद... इथली माझी पहिलीच गझल होती..
चित्तरंजनजी,
तुम्ही सुचवलेला बदल पटला... पण त्यात 'तुला' हे गाळावं लागतंय.. आणि मग शब्द कुणाला खातरीचे वाटले हे संदिग्ध होईल...
प्रदीपजी,
'भरवसा' च्या शेरात मी "ठेवायला" हा रदीफ घ्यायची इच्छा नव्हती... ठेवणे हे क्रियापद मग आणखी बर्याच शब्दांबरोबर वापरता येईल... पण मग आवडला मलाही तो शेर..
शेवटच्या शेरात ''वार तू करताच मी घायाळ वगैरे न होता आधी दरवळाया लागलो... श्वास नंतर उसवायला लागले (हा भाग अलाहिदा).'' असं म्हणायचं होतं.. कदाचित ते पोचलं नसेल..
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद... चुभूद्याघ्या..
ज्ञानेश.
रवि, 12/04/2009 - 09:38
Permalink
हेच..
भाव, सोंग आणि सारवासारव हे शेर फारच मस्त!!
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला? / फक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला
... वा वा! छानच मिसरे.
हेच म्हणतो.
अजय अनंत जोशी
रवि, 12/04/2009 - 23:46
Permalink
छानच
वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा
सोबती कोणीच नसता जीव हा रमवायला
शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
कलोअ चूभूद्याघ्या
आजानुकर्ण
सोम, 13/04/2009 - 04:53
Permalink
छान
सुरेख गझल. फार आवडली.
आजानुकर्ण
सोम, 13/04/2009 - 04:53
Permalink
(No subject)
चांदणी लाड.
सोम, 13/04/2009 - 14:54
Permalink
वाह..!! एकदम
वाह..!! एकदम सही गझल.
वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा
सोबती कोणीच नसता जीव हा रमवायला
शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
लोक काठी बसुन माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
सोंग आहे रोजचे - सार्यांस ऐसे वाटले
फक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला
हे शेर फार आवडले.