भेट एकदा


विरहाचे जाळती निखारे... भेट एकदा
खुणावती रोजचे किनारे... भेट एकदा


धुंद पौर्णिमा, चंद्र चांदण्या, नटले अंबर 
नभातले चल, मोजू तारे... भेट एकदा


पहा ढगांची, दाटी झाली, गगनामध्ये
सोसाट्याचे, आले वारे... भेट एकदा


तुझी आठवण, देउन जाते, हळूच झोका
क्षणात फुलती, गोड शहारे... भेट एकदा


तुझ्याविना हे, असह्य जीवन, एकाकीपण
सांगितले तुज किती प्रकारे... भेट एकदा


किती खुणावू, कसे पुकारू, समजत नाही
कसे न कळती तुला इशारे?... भेट एकदा


"सोसायाचा किती दुरावा असा 'अगस्ती'?"
"सांग पुन्हा भेटशील ना रे?.... भेट एकदा"


--- अगस्ती

गझल: 

प्रतिसाद

तुझ्याविना हे, असह्य जीवन, एकाकीपण
सांगितले तुज किती प्रकारे... भेट एकदा

सुंदर  शेर  !
 

तुझ्याविना हे, असह्य जीवन, एकाकीपण
सांगितले तुज किती प्रकारे... भेट एकदा वाव्वा.....फारफार आवडला हा शेर.पंत बर्‍याच दिवसांनी तुमची  रोम्यांटिक गझल. वाचून फार बरे वाटले.

वरील 'लोकांशी' सहमत.
कलोअ चूभूद्याघ्या