यशोदीप








* यशदीप *



मी नभांवर नाचत आले
चांदण्यांवर चालत आले


वीज ही वर का चमकते
सूर्याला जर पाहत आले


बंड हे करणारच आता
विजयी मन हासत आले


सारले मळभट दु:खाचे
सुख हाती मावत आले


तेजस्वी मज साठीच वाटा
यशदीप लावत आले

- स्वप्ना








Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

आपण सुरुवात बरोबर केली आहे:
मी  नभांवर नाचत आले
चांदण्यावर चालत आले
गण आहेतः २ १ २ २ | २ २ २ २
पुढे मात्र गण एकसारखे नाहीत, एक
उजळल्या तेजाने वाटा
सोडले तर. घाई करू नये एवढेच म्हणिन.
 

पहिल्यापेक्षा बरीच सुधारणा आहे. वृत्तांचा अभ्यास करावा. एल्गार आणि गझलेची बाराखडीचा संदर्भ घ्यावा.

वीज ही वा काय चमकते
-२-१- -२-२- पाहत आले*

बंड हे करणारच आता
विजय -२-२- हासत आले *

सारले मी मळभ व्यथेचे
सौख्य -२-२- मावत आले *

तेजस्वी मज साठीच वाटा *
दीप -२-२- लावत आले *

* या ओळींचा पुन्हा विचार करावा...
-२-२- या ठिकाणी २+२ असा ए़कूण ४ मात्रांचा शब्द अपेक्षित आहे,
तो आपल्या कल्पनेने यावा म्हणून जागा रिक्त ठेवली आहे...
" तेजस्वी मज साठीच वाटा * " ही ओळ
"२ १ २ १ १ २ १ १ २ २" अशी करून घ्यावी...
...चूभूदेघे...