यशोदीप
* यशदीप *
मी नभांवर नाचत आले
चांदण्यांवर चालत आले
वीज ही वर का चमकते
सूर्याला जर पाहत आले
बंड हे करणारच आता
विजयी मन हासत आले
सारले मळभट दु:खाचे
सुख हाती मावत आले
तेजस्वी मज साठीच वाटा
यशदीप लावत आले
- स्वप्ना
Taxonomy upgrade extras:
कशास व्यासपीठ पाहिजे तुला?
घराघरात गीत गुणगुणून जा
* यशदीप *
मी नभांवर नाचत आले
चांदण्यांवर चालत आले
वीज ही वर का चमकते
सूर्याला जर पाहत आले
बंड हे करणारच आता
विजयी मन हासत आले
सारले मळभट दु:खाचे
सुख हाती मावत आले
तेजस्वी मज साठीच वाटा
यशदीप लावत आले
- स्वप्ना
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
बुध, 25/04/2007 - 17:38
Permalink
सुरुवात बरोबर
आपण सुरुवात बरोबर केली आहे:
मी नभांवर नाचत आले
चांदण्यावर चालत आले
गण आहेतः २ १ २ २ | २ २ २ २
पुढे मात्र गण एकसारखे नाहीत, एक
उजळल्या तेजाने वाटा
सोडले तर. घाई करू नये एवढेच म्हणिन.
संपादक
बुध, 25/04/2007 - 19:15
Permalink
सुधारणा आहे
पहिल्यापेक्षा बरीच सुधारणा आहे. वृत्तांचा अभ्यास करावा. एल्गार आणि गझलेची बाराखडीचा संदर्भ घ्यावा.
जनार्दन केशव म्...
शुक्र, 14/12/2007 - 19:44
Permalink
स्वप्ना, आपण असे करुया...
वीज ही वा काय चमकते
-२-१- -२-२- पाहत आले*
बंड हे करणारच आता
विजय -२-२- हासत आले *
सारले मी मळभ व्यथेचे
सौख्य -२-२- मावत आले *
तेजस्वी मज साठीच वाटा *
दीप -२-२- लावत आले *
* या ओळींचा पुन्हा विचार करावा...
-२-२- या ठिकाणी २+२ असा ए़कूण ४ मात्रांचा शब्द अपेक्षित आहे,
तो आपल्या कल्पनेने यावा म्हणून जागा रिक्त ठेवली आहे...
" तेजस्वी मज साठीच वाटा * " ही ओळ
"२ १ २ १ १ २ १ १ २ २" अशी करून घ्यावी...
...चूभूदेघे...