त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली
त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली
का हव्याशा वाटणार्या आठवांना टाळले मी
फक्त आहे तीच सोबत हेच होते मानले मी
....................................................
'फोन नंबर दे म्हणाला,' तो मलाही शेवटी मग-
भेटण्याचे , लाजण्याचे खूप इमले बांधले मी
त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली
अन् फुलाला जागण्याचे भान आले ..शोधले मी
............................................
का धरावी सोबतीची आस त्याने आज माझ्या?
जीवघेणे पावसाळे एकटीने काढले मी
बोलतो तो एक करतो वेगळे काही.. तरीही
(नाटकी त्या बोलण्यावर केवढे हे भाळले मी)
आणले पैसे कसे ही चौकशी तू का करावी ?
खर्च केला कोणता तू ?काय केले ?काढले मी?
गप्प असणे, वाकणे ही संमती नाहीच माझी ..
बांधलेली गाय बकरी का कुणाला वाटले मी ?
- सोनाली जोशी
प्रतिसाद
पुलस्ति
मंगळ, 24/02/2009 - 07:13
Permalink
वा!
सुंदर गझल सोनाली!
पावसाळे आणि गाय-बकरी हे शेर विशेष आवडले.
ज्ञानेश.
मंगळ, 24/02/2009 - 22:20
Permalink
वेगळीच...
वेगळीच गझल आहे. म्हणजे गझल उलगडत वगैरे जात नाही या सर्वसामान्य नियमाला ही गझल अपवाद आहे. म्हटले तर प्रत्येक शेर वेगळा आहे, म्हटले तर एकच विषय पुढे नेला आहे.
खूप छान वाटले पण वाचल्यानंतर!
चित्तरंजन भट
गुरु, 26/02/2009 - 03:10
Permalink
गप्प असणे, वाकणे ही संमती नाहीच माझी ..
आणले पैसे कसे ही चौकशी तू का करावी ?
खर्च केला कोणता तू ?काय केले ?काढले मी?
गप्प असणे, वाकणे ही संमती नाहीच माझी ..
बांधलेली गाय बकरी का कुणाला वाटले मी ?
वरील द्विपदी विशेष आवडल्या. एकंदर चांगलीच धारदार आणि वेगळी झाली आहे.
प्रसाद लिमये
गुरु, 26/02/2009 - 21:55
Permalink
सुरेख वेगळ
सुरेख
वेगळी आणि सुरेख आहे गझल
जीवघेणे पावसाळे हा शेर खूप आवडला
अजय अनंत जोशी
गुरु, 26/02/2009 - 23:23
Permalink
छान
छान आहे गझल.
कलोअ चूभूद्याघ्या
केदार पाटणकर
शुक्र, 27/02/2009 - 11:13
Permalink
ज्ञानेशशी सहमत
ज्ञानेशशी अगदी सहमत.
पावसाळ्याचा शेर छान.
वैभव जोशी
शुक्र, 27/02/2009 - 12:09
Permalink
फोन नंबर
चा शेर मस्त आहे.
का धरावी सोबतीची आस त्याने आज माझ्या?
जीवघेणे पावसाळे एकटीने काढले मी
इथे उला मिसरा
का धरावी आज त्याने आस माझ्या सोबतीची
असा आणखीन सहज झाला असता असे वाटले.
शुभेच्छा
अच्युत
सोम, 02/03/2009 - 09:58
Permalink
एकदम सहज
एकदम सहज सुंदर आणि वेगळी गझल
त्यातल्या त्यात जीवघेणे पावसाळे आणि नाटकी त्या बोलण्यावर हे दोन शेर छान वाटले
अनंत ढवळे
मंगळ, 03/03/2009 - 10:27
Permalink
जीवघेणे पावसाळे एकटीने काढले मी
जीवघेणे पावसाळे एकटीने काढले मी..
वा !