कुठेच आता सवाल नाही

कुठेच आता सवाल नाही
कुठेच आता बवाल नाही

कशास पळता आता वळुनी
हातात माझ्या मशाल नाही

मला समजले फकीर त्यांनी
असो भिकारी, मवाळ नाही

तुझ्या घराशी मरेन म्हणतो
दुजा बहाणा जहाल नाही

तुझ्या सुरांशी कधीच नव्हतो
उगाच गाणे रटाळ नाही

उगाच भिंती खचुन गेल्या
असा कुठेही महाल नाही

मनात गातो तुझ्या कविता
उगीच कोठे, खुशाल नाही

संतोष (कवितेतला)

गझल: 

प्रतिसाद

संतोषजी मी लिहितो आहे ते सहृदय पहा.
आपल्या उपरोक्त गझलेत वृत्त दोष आहेत. मात्रा प्रत्येक ओळीत तेवढ्याच लागतात. ते तपासून पहा.
हातात माझ्या मशाल नाही      -  इथे एक मात्रा जास्त आहे. हातात ऐवजी हाती करता येईल.
मनात गातो तुझ्या कविता      - इथे १ मात्रा कमी आहे.   'तुझ्याच' असे करता येईल.
'ल' या अक्षराबरोबर 'ळ' बसतो का? हा चर्चेचा विषय आहे.
मतल्यात २ वेळा 'वाल' घेतल्यानंतर खाली बदल आहे. तो कदाचित चालू शकेल.
उगाच भिंती खचुन गेल्या             - इथे खचून गेल्या असे करा.
असा कुठेही महाल नाही
हा शेर मस्तच.
शुभेच्छा.

कलोअ चूभूद्याघ्या