...मी नवा-निराळा आशय !
.......................................................
...मी नवा-निराळा आशय !
.......................................................
एवढीच ओळख माझी; एवढाच माझा परिचय !
रोजच्याच शब्दांमधला मी नवा-निराळा आशय !
सोस का तुला हा इतका ? थांबवून करशी सांत्वन...
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?
कोरडे तुम्ही अश्रूंनो ! दाखवा जरा अपुलेपण...
वाळवंट आयुष्याचे मी करू कशाने जलमय ?
वाकवू बघे मज दुनिया...वाकणार नाही मी पण...
मोडलो़; तरीही केला मी पुन्हा पुन्हा हा निश्चय !
ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !
तू सदेह यावे हृदयी काढता तुझा मी आठव...!
मी तुझ्या निराकाराला पाहण्यात व्हावे तन्मय !!
जे घडायचे त्याची का बांधता न आली अटकळ ?
का घडून गेले त्याचा लावता न आला अन्वय ?
नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?
वाटते तसे हे सोपे; पण तसे किती हे अवघड...!
नेटके असावे लिहिणे...रोकडा असावा प्रत्यय... !!
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
ज्ञानेश.
शनि, 21/02/2009 - 09:39
Permalink
अप्रतिम...
प्रदीपजी, अप्रतिम गझल !! तुमच्या काही सर्वश्रेष्ठ गझलांत हिचा समावेश होईल.
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?
सुरेख!
हे शेर फारच आवडले-
ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !
तू सदेह यावे हृदयी काढता तुझा मी आठव...!
मी तुझ्या निराकाराला पाहण्यात व्हावे तन्मय !!
जे घडायचे त्याची का बांधता न आली अटकळ ?
का घडून गेले त्याचा लावता न आला अन्वय ?
नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?
वाटते तसे हे सोपे; पण तसे किती हे अवघड...!
सहमत!!!
ॐकार
शनि, 21/02/2009 - 10:28
Permalink
नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !वा!
जे घडायचे त्याची का बांधता न आली अटकळ ?
का घडून गेले त्याचा लावता न आला अन्वय ?चांगला आहे.
नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?वाव्वा! मस्त!
योगेश जोशी
शनि, 21/02/2009 - 11:29
Permalink
दमदार गझल
दमदार गझल..प्रत्येक शेर खणखणीत.
भटांच्या गझलांची जशी एक खासियत आहे तशीच आपल्या गझलांची सुध्दा आहे.
अजय अनंत जोशी
शनि, 21/02/2009 - 12:32
Permalink
टकटक
मतला आणि टकटक सुंदर. टकटक = मस्तच.
मात्र, बाकी सर्व मला तरी विरोधाभासची (कि विरोधी शब्दांची) जुळवाजुळव वाटली.
अगदी जसेच्या तसे सुचले असेल तर उत्तमच.
कलोअ चूभूद्याघ्या
चित्तरंजन भट
शनि, 21/02/2009 - 14:47
Permalink
नेटके असावे लिहिणे...रोकडा असावा प्रत्यय... !!
अख्खी गझल फारफार आवडली. "नेटके असावे लिहिणे रोकडा असावा प्रत्यय" ह्याची प्रचीती देणारी :).
नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?
वा!
ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !
फारच सुरेख! क्या बात है.
सोस का तुला हा इतका ? थांबवून करशी सांत्वन...
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?
फारच सुरेख!
सोनाली जोशी
रवि, 22/02/2009 - 00:28
Permalink
वा वा
प्रदीप, गझल अतिशय आवडली.
आश्रय, संशय आणि मक्ता तर फार अप्रतिम आहेत.
सोनाली
मानस६
रवि, 22/02/2009 - 10:04
Permalink
दमदार
दमदार मतला व मक्ता
सोस का तुला हा इतका ? थांबवून करशी सांत्वन...
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?.. वा!
तू सदेह यावे हृदयी काढता तुझा मी आठव...!
मी तुझ्या निराकाराला पाहण्यात व्हावे तन्मय !!.. सर्वांचा प्रवास निरंतर ह्याच दिशेने होत रहावा.. ही द्विपदी अतिशय आवडली..
ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !... वा!
जे घडायचे त्याची का बांधता न आली अटकळ ?
का घडून गेले त्याचा लावता न आला अन्वय ?.... ह्याचे संदर्भ तर काळाच्याही पलिकडील आहेत... वा!-मानस६
प्रदीप कुलकर्णी
रवि, 22/02/2009 - 16:58
Permalink
सगळ्यांचे मनापासून आभार
प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.
नचिकेत
सोम, 23/02/2009 - 10:45
Permalink
अप्रतिम!!
पुर्ण गझल खणखणीत!!
वैभव जोशी
सोम, 23/02/2009 - 16:11
Permalink
नेहमीच विश्वासाने
नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?
वाटते तसे हे सोपे; पण तसे किती हे अवघड...!
नेटके असावे लिहिणे...रोकडा असावा प्रत्यय... !!
वाह ! वाह ! . सुंदर
पुलस्ति
सोम, 23/02/2009 - 18:45
Permalink
वा!
टकटक, अटकळ आणि प्रत्यय हे शेर फार आवडले!!
आनंदयात्री
बुध, 25/02/2009 - 18:41
Permalink
वा वा...
अप्रतिम....
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय!
बढिया!!!!!!!!!
- नचिकेत
प्रसाद लिमये
गुरु, 26/02/2009 - 22:00
Permalink
मस्त
सगळेच शेर सुरेख
आश्रय ..आणि संशय........ हे दोन खूप आवडले
जयन्ता५२
शुक्र, 27/02/2009 - 01:22
Permalink
सहमत!
पूर्ण सहमत!
जयन्ता५२
केदार पाटणकर
शुक्र, 27/02/2009 - 10:58
Permalink
उत्तम
...उत्तम !(नेहमीप्रमाणे)