'गझल अंतीम भूषणची.....'
तिथे ना फायदा काही कधी बोलून तत्वाचे
जिथे की कोण आहे बोलणारे हे महत्वाचे
चला बाहेर काढा शेपटी, मी चाललो आहे
गिळा बूटी जडी, पिटवा नगारे पौरुषत्वाचे
चरा निर्धास्त आता हंबरा शिमगा करा पोळा
गवत तुमच्याचसाठी पेरले भरपूर सत्वाचे
जरासा आसरा शोधून ठेवा हालण्याआधी
नसे ज्याच्यात मी ते विश्व होते बिनगुरुत्वाचे
गझल अंतीम भूषणची ममत्वानेच ओथंबे
तिच्यामधे कशाला शब्द हे यावे कटुत्वाचे?
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
सोम, 16/02/2009 - 18:41
Permalink
सर्व छान.
शेवटच्या दोन शेरातील उकार सोडून बोलतो आहे.
चला बाहेर काढा शेपटी, मी चाललो आहे
गिळा बूटी जडी, पिटवा नगारे पौरुषत्वाचे
चरा निर्धास्त आता हंबरा शिमगा करा पोळा
गवत तुमच्याचसाठी पेरले भरपूर सत्वाचे झ का स
तिथे ना फायदा काही कधी बोलून तत्वाचे
जिथे की कोण आहे बोलणारे हे महत्वाचे खरेच.
कलोअ चूभूद्याघ्या
ज्ञानेश.
मंगळ, 17/02/2009 - 00:39
Permalink
सुरेख अन् दुर्दैवी....
गझल सुरेख आहे. दोन शेर तर भलतेच तिखटजाळ आहेत !
पण- गझल अंतीम भूषणची हा जर निर्णय असेल, तर अत्यंत दुर्दैवी आहे. साहित्यबाह्य कारणांमुळे लिखाण थांबवणे (वा प्रकाशित न करणे) अयोग्य आहे.
फारच उद्विग्नता आली असल्यास 'ब्रेक' घ्यावा. (जोशींनी 'विराम' असे वाचावे... :) काही दिवस कटाक्षाने गझल प्रकाशित करू नये आणि नंतर पुनरागमन करावे, असा माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे. अशा 'ब्रेक' चा निश्चित फायदा होतो, हा माझा अनुभव आहे.
बाकी तुम्ही सुजाण आहात. योग्य निर्णय घ्याल, अशी आशा करतो !
सुनेत्रा सुभाष
मंगळ, 17/02/2009 - 08:43
Permalink
प्रतिसाद
मा.भूषण,
दूसरा शेर वगळता बाकी गझल खरोखरच खूप आवडली.
ॐकार
गुरु, 19/02/2009 - 09:47
Permalink
मतला आवडला
तिथे ना फायदा काही कधी बोलून तत्वाचे
जिथे की कोण आहे बोलणारे हे महत्वाचे
मस्त शेर आहे!
वैभव जोशी
सोम, 23/02/2009 - 16:24
Permalink
मतला
सुरेख आहे. ऒकार ला अनुमोदन
वैभव देशमुख
शुक्र, 06/03/2009 - 17:12
Permalink
सहमत
एक शेर वगळता पुर्ण आवडली......