मृगजळ
प्रत्येक शर्यतीचा मी भाग होत गेलो
हर एक मृगजळाचा मी माग घेत गेलो
मोडीत काढली ती तत्त्वे जुनाट सारी
बहुमोल दागिन्यांना मी डाग देत गेलो
दु:खात काय मोठे, ते रोजचेच आहे
घेऊन मी सखीसम त्याला कवेत गेलो
टीकास्त्र सोडणारे जमले किती शिखंडी
अर्जुन कुणी नसावा ह्या वंचनेत गेलो
जा वैषयिक सुखांनो, शोधा नवीन गात्रे
चिरकालच्या सुखाच्या आता गुहेत गेलो
मस्तीत जीवनाला मी कुर्नीसात केला
मृत्यूस भेटण्याही मोठ्या मजेत गेलो
ह्या कागदी फुलांच्या सोडून, 'भृंग', बागा
स्वप्नातल्या कळीचा मी शोध घेत गेलो
गझल:
प्रतिसाद
प्रणव सदाशिव काळे
बुध, 25/04/2007 - 14:55
Permalink
जा वैषयिक सुखांनो, शोधा नवीन गात्रे
जा वैषयिक सुखांनो, शोधा नवीन गात्रे
चिरकालच्या सुखाच्या आता गुहेत गेलो
आवडले.
मिलिंद फणसे
बुध, 25/04/2007 - 21:42
Permalink
दु:खात काय
दु:खात काय मोठे, ते रोजचेच आहे
घेऊन मी सखीसम त्याला कवेत गेलो
त्याच्या कवेत गेलो हवे का? नसल्यास कोणाच्या कवेत हा सवाल.
- दु:खाला मी माझ्या कवेत घेऊन गेलो.
"या जगात ऐकू आली डबक्यांची गाज कुणाला?
हो 'मिलिंद' सागर तेव्हा कवनांना कंठ फुटावा"
चित्तरंजन भट
बुध, 25/04/2007 - 21:56
Permalink
माझे मत
बरोबर. इथे शब्दक्रम सुधारायला हवा, असे सुचवायला हवे होते.
त्याला सखीपरी मी घेउन कवेत गेलो
घेउन कवेत च्या शेजारी असायला हवा होता.
प्रश्न दागिन्यांचा नाही. अधिक चपखल शब्दयोजना मलातरी अपेक्षित होती. तीच गोष्ट अनेक शेरांची. थोडे थांबून लिहिल्यास, ओबडधोबडपणा प्रयत्नपूर्वक घालवता येतो, असा अनुभव आहे.