येतात सोबती हे..

येतात सोबती हे भेटायला मला..


की कावळेच येती टोचायला मला?


 


निघणार धिंड माझी, थोडाच वेळ बाकी


येतील दोस्त माझे सजवायला मला!


 


मी राहतो तिथे, त्या वठल्या तरूतळी


नेतील तोडुनी ते जाळायला मला!


 


आहे विखूरलो मी आता दिशांत दाही


येऊ नकोस तूही वेचायला मला!


 


मी छेडल्या सुरांना टाळून सर्व गेले


का थांबलीस मग तू ऐकायला मला?


 


मी घोट पाण्याचा कुणा मागीतला होता,,


आला समुद्र सारा भेटायला मला!


 


देतात साथ मजला हे चंद्र सूर्य तारे


गातो निसर्ग गाणी रिझवायला मला!


 


ते व्यर्थ ग्रंथ सारे, जे आजवरी पढले..


चेहेरा तुझा न जमला वाचायला मला!


 


जो घाव इथे सोसे, देवत्व त्यास लाभे


पण घाव सोसले तू घडवायला मला!


 


ह्या कोवळ्या कळ्यांची घेऊन जा शपथ की


येशील परतुनी तू हसवायला मला!


 


होऊन मोकळी जा माझ्या कवेतुनी, दे..


संभार कुंतलांचा गुंतायला मला!

गझल: 

प्रतिसाद

मतल्यात     गागालगालगागा गागालगालगा  असे आहे. ते सर्व ठिकाणी नाही.
कलोअ चूभूद्याघ्या

वृत्त सांभाळावे अशी विनंती!

ऐकायला आणि वेचायला हे शेर खरच फार सुरेख आशयाचे आहेत.

सर्वांना धन्यवाद.........आवश्यक सुधारणा केल्या जातील!

सर्वांना धन्यवाद्.......आवश्यक सुधारणा केल्या जातील...!

सुधारणा केल्यास आशयाच्या अंगाने पाहिल्यास गझल छान आहे.