दिसतो तुला जरी मी.........

दिसतो तुला जरी मी हिरवा अजून आहे
र्हुद्यात खोल माझ्या वणवा अजून आहे


विसरून वाट जातो माझ्याच मी घराची
वळणावरी जुन्या त्या चकवा अजून आहे


माझाच चेहरा तो दिसतोय डोळियाना
की आरसा  तुझा हा फसवा अजून आह्वे


आहे अजून मजला बिल्गून दुख माझे
माझ्यावरी सुखा॑चा रुसवा अजून आहे


म्रुत्यो म्हणे निघाला भेटावयास मजला
आहे खरेच की ही अफवा अजून आहे.....


                     वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

चकवा अन अफवा हे छान शेर! आवडले.

दिसतो तुला जरी मी हिरवा अजून आहे
र्हुद्यात खोल माझ्या वणवा अजून आहे- टंकलेखनाची चूक काढता येईल.

माझाच चेहरा तो दिसतोय डोळियाना - डोळियांना - अनुस्वार टाकता येईल.
की आरसा  तुझा हा फसवा अजून आह्वे

आहे अजून मजला बिल्गून दुख माझे - बिलगून
माझ्यावरी सुखा॑चा रुसवा अजून आहे

म्रुत्यो म्हणे निघाला भेटावयास मजला - मृत्यो हे मृत्यूला उद्देशून संबोधन आहे. या शेरात मृत्यू असा शब्द यावा.
  मित्राप्रमाणे विचार मांडले. राग धरू नये. अगदीच किरकोळ त्रुटी आहेत ज्या सहज संपादित करता येतील.
धन्यवाद!

रुसवा,चकवा हे शेर छान जमलेत.

वैभवजी, सातत्याने  दर्जेदार  गझला  येताहेत  तुमच्या. अभिनंदन!
विसरून वाट जातो माझ्याच मी घराची
वळणावरी जुन्या त्या चकवा अजून आहे
...क्या  बात  है. दीर्घकाळ  लक्षात राहणारा शेर.
माझाही  एक शेर ऐकावा-
"माझ्या  चुका  तिच्याही, लक्षात आज नाही,
दुर्दैव  एवढे  की, रुसवा  अजून  आहे...."

 
तुमचा  हा शेरही  कायम  आठवत असतो-
"या  जन्मी  ओळख  नाही  होणार तुझी  काट्यांशी..
आलीस कपाळावर  तू, गोंदून फुलांचा  रस्ता.."


धन्यवाद.

सुरेख गझल वैभवजी!

व्वा...छान...
विसरून वाट जातो माझ्याच मी घराची
वळणावरी जुन्या त्या चकवा अजून आहे
माझाच चेहरा तो दिसतोय डोळियाना
की आरसा  तुझा हा फसवा अजून आह्वे
आहे अजून मजला बिल्गून दुख माझे
माझ्यावरी सुखा॑चा रुसवा अजून आहे
म्रुत्यो म्हणे निघाला भेटावयास मजला
आहे खरेच की ही अफवा अजून आहे.....

मतला आणि मृत्यू हे शेर आवडले!

पहिला आणि शेवटचा विशेष.
कलोअ चूभूद्याघ्या

प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

वैभव मस्त गझल..

मतला आणि शेवटचा खूप आवडले