एकरूप
जरी सांजवेळी तुज टाळते मी,
उरी आठवांची खुण ठेवते मी.
किती गोड आहे जुलमी सख्या तू,
पहाटे कळ्यांना गुज सांगते मी.
नशा भेटण्याची तुज आकळेना,
मनस्वी तुझा हा छळ सोसते मी.
व्यथा, ठेच कोठे? चटके जिवाला,
मिळाले मला ते वळ मोजते मी.
मला आसरा तू, तुज मी निवारा,
असे छानसे रे घर मांडते मी.
पहा..!! चांदणे अन अनुकूल सारे,
जुन्या जाणिवांचे क्षण मागते मी.
भिडू थेट व्याकुळ नयनांत आता,
इशारे तुझे हासत टाळते मी.
अरे..!! याचसाठी बदनाम झाले,
सख्या रे तुझ्यावर जिव टाकते मी.
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 09/02/2009 - 15:46
Permalink
छान!
पुतणी लाड,
छान गझल!
व्याकुळ नयनात भिडू, चांदणे अनुकूल, या ओळी छान आहेत.
दशरथयादव
सोम, 09/02/2009 - 16:34
Permalink
व्वा..छान न
व्वा..छान
नशा भेटण्याची तुज आकळेना,
मनस्वी तुझा हा छळ सोसते मी.
कुठे ठेच? व्यथा, चटके जिवाला,
मिळाले मला ते वळ मोजते मी.
मला आसरा तू, तुज मी निवारा,
असे छानसे रे घर मांडते मी.
अरे..!! याचसाठी बदनाम झाले,
सख्या रे तुझ्यावर जिव टाकते मी
गौतमी
बुध, 11/02/2009 - 11:24
Permalink
सुंदर गझल
फार सुरेख गझल केलीस चांदणी..
छळ सोसते मी फार छान शेर आहे.
अजय अनंत जोशी
बुध, 11/02/2009 - 18:53
Permalink
वॄत्त सांभाळले आहे का?
आशयाबद्दल अनेकांनी सांगितले. माझे तेच मत.
पण आपण,
ल गा गा, ल गा गा, ल ल गा, ल गा गा असे वॄत्त घेतले आहे.
१ २ २ १ २ २ १ १ २ १ २ २ = १९ मात्रा
कशी रे? तुझ्याशी एकरूप झाले, इथे वॄत्त भंगले आहे. एकरूप = गा ल गा ल
लगा गा ल गा गा गालगाल गागा असे झाले आहे. ए हे अक्षर २ मात्रेचे आहे.
रु र्हस्व घेतल्याने मात्रा जुळतील. पण ते चूक आहे
कुठे ठेच? व्यथा, चटके जिवाला, इथेही वॄत्त भंगले आहे. व्यथा = ल गा
लगा गाल ल गा ललगा लगागा
व्य जरी जोडाक्षर असले तरी त्याचा उच्चार इथे १ मात्रेचाच आहे. व्यथामधल्या व्य वर जोर देता येणार नाही.
मला जेवढे समजते ते मी सांगितले.
अरे..!! याचसाठी बदनाम झाले,
सख्या रे तुझ्यावर जिव टाकते मी
हे मात्र खूपच छान. पहिली ओळ वाचल्यावर दुसर्या ओळीचा उलट अंदाज छान.
कलोअ चूभूद्याघ्या
चांदणी लाड.
शनि, 14/02/2009 - 10:31
Permalink
$भूषण काका,
$भूषण काका, दशरथजी, अजयजी, गौतमीजी अभिप्रायाबद्द्ल आभार..!!
$ अजयजी, मार्गदर्शनाबद्द्ल धन्यवाद..!! वॄत्त सांभाळले होते, "ए" गुरू आहे हे पहील्यांदाच समजले, जोडाअक्षरी शब्दात जरा गोंधळ होतो. आता शंका फिटल्या पुन्हा चूक होणार नाही.
$असेच मार्गदर्शन लाभावे.
लोभ/ लाभ असावा:)
दशरथयादव
शुक्र, 15/05/2009 - 13:45
Permalink
पुन्हा
पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा ओळी ....सहजता छान जमली आहे
अरे..!! याचसाठी बदनाम झाले,
सख्या रे तुझ्यावर जिव टाकते मी.