गझल माझी तसतशी
पाहुनी उत्साह माझा सुन्न होते
उम्र होण्याचीच माझ्या उम्र होते
फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते
पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते
केवढा पिवळा अताशा वाटशी तू
सापडावे जे जुने हळकुंड होते
काय या देहात जादू कोण जाणे?
मद्य जाते आत आणी धुंद होते
काय या मद्यात जादू कोण जाणे?
घोट जातो आत छाती रुंद होते
का मला ओलावते आहेस आता?
जन्मभर आयुष्य हे निवडुंग होते
जसजसा जमिनीमधे मी एक होतो
गझल माझी तसतशी उत्तुंग होते
पावसाची चिन्हही नाहीत येथे
वाळवंटाची हवा का कुंद होते?
गझल:
प्रतिसाद
दशरथयादव
शुक्र, 06/02/2009 - 17:56
Permalink
सुरेख........
सुरेख........
फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते
पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते
केवढा पिवळा अताशा वाटशी तू
सापडावे जे जुने हळकुंड होते
काय या देहात जादू कोण जाणे?
मद्य जाते आत आणी धुंद होते
दशरथयादव
शुक्र, 06/02/2009 - 17:56
Permalink
सुरेख........
सुरेख........
फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते
पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते
केवढा पिवळा अताशा वाटशी तू
सापडावे जे जुने हळकुंड होते
काय या देहात जादू कोण जाणे?
मद्य जाते आत आणी धुंद होते
अजय अनंत जोशी
शनि, 07/02/2009 - 21:21
Permalink
उंटावरचे...
पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते व्वा!
बाकी विशेष भावले नाही. ओळींमध्ये सफाई वाटली नाही.
आपल्यासारखाच एक प्रश्नः-
पाहुनी उत्साह माझा सुन्न होते सुन्न होते खरे. पण कोण?
उम्र होण्याचीच माझ्या उम्र होते
या ओळीतला अर्थ समजतोय पण संदर्भ लागत नाही आहे वरच्या ओळीला.
पावसाची चिन्हही नाहीत येथे
वाळवंटाची हवा का कुंद होते? विचार छान.
वाळवंटीची असे हवे होते का? कारण हवा वाळवंटाची नसते तर वाळवंटातील असते.
वाळवंटीची (वाळवंटामधील) असे होऊ शकेल.
कलोअ चूभूद्याघ्या
समीर चव्हाण (not verified)
रवि, 08/02/2009 - 13:15
Permalink
चांगला शेर
का मला ओलावते आहेस आता?
जन्मभर आयुष्य हे निवडुंग होते
सुनेत्रा सुभाष
सोम, 09/02/2009 - 16:08
Permalink
छान शेर
फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते