सोबतीचा आव आहे
भोवती अंधार आहे, रात नाही
सोबतीचा आव आहे, साथ नाही
कोणताही खेळ आता फार सोपा
मोडतो जो नियम तोही बाद नाही
ठेवले मी स्वखुषीने शस्त्र खाली
हारलो मी,पण दिली तू मात नाही
भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही
कां असा माझ्या घराला शाप आहे?
अंगणी येतात सारे, आत नाही
सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो
एक जन्माचाच होता, सात नाही"
.(जयन्ता५२)
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
सोम, 02/02/2009 - 21:15
Permalink
छान.
भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही छान वाटला.
कां असा माझ्या घराला शाप आहे?
अंगणी येतात सारे, आत नाही हा ही छान.
सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो
एक जन्माचाच होता, सात नाही" हा तर भलताच आवडला.
ठेवले मी स्वखुषीने शस्त्र खाली इथे वृत्त मोडते आहे. स्व र्हस्वच धरावा असे माझे मत आहे. दुसरे म्हणजे स्व वापरल्यानंतर मी ची योजना पुनरावृतीची वाटते. असे जमेल का?
ठेवले बघ मी खुषीने शस्त्र खाली
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
सोम, 02/02/2009 - 21:51
Permalink
खरे!
अजयचे म्हणणे खरे आहे.
पण! हे शेर अप्रतिम!
कां असा माझ्या घराला शाप आहे?
अंगणी येतात सारे, आत नाही
सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो
एक जन्माचाच होता, सात नाही"
दशरथयादव
मंगळ, 03/02/2009 - 13:10
Permalink
व्वा...छान..
व्वा...छान..
कां असा माझ्या घराला शाप आहे?
अंगणी येतात सारे, आत नाही
प्रसाद लिमये
बुध, 04/02/2009 - 17:32
Permalink
कां असा
कां असा माझ्या घराला शाप आहे?
अंगणी येतात सारे, आत नाही
सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो
एक जन्माचाच होता, सात नाही"
सगळेच शेर आवडले, पण हे दोन जबरदस्त आहेत
तिलकधारी
शुक्र, 06/02/2009 - 12:10
Permalink
सोबतीचा आव अहे
सोबतीचा आव आहे.
सुनेत्रा सुभाष
सोम, 09/02/2009 - 16:26
Permalink
सुरेख शेर
भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही
कां असा माझ्या घराला शाप आहे?
अंगणी येतात सारे, आत नाही
सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो
एक जन्माचाच होता, सात नाही"
गौतमी
शुक्र, 13/02/2009 - 10:13
Permalink
सुरेखच
अतिशय सुरेख शेर आहेत सगळे.
ॐकार
गुरु, 19/02/2009 - 09:46
Permalink
पण तुझे फर्मान आले, साद नाही
भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही