किती खाल हो..?
किती खाल हो..?
मला द्याल हो!
मला सोडता...?
सुखी व्हाल हो..?
दिशा घालिती,
मला शाल हो!
जगावे असे,
किती साल हो?
अम्हा आवडे,
चिनी माल हो!
सुखांना म्हणा,
कधी याल हो?
स्मरा कासवा!
पुढे जाल हो!
पऱ्या पाहू या..?
जरा बाल हो!
भरावे कुणी,
रिते भाल हो?
मुले पाहती..
किती प्याल हो?
जरी भांडता,
तरी याल हो..!
-मानस६
प्रतिसाद
सुनेत्रा सुभाष
सोम, 02/02/2009 - 10:25
Permalink
अप्रतिम गझल
सगळी गझलच छान आहे.
भूषण कटककर
सोम, 02/02/2009 - 22:05
Permalink
लहान वृत्त
वैभवसाहेबांच्या 'त्रास नुसता' या मोठ्या वृत्तातील गझलेनंतर ही एक लहान वृत्तातली गझल पहायला मिळाली. खालील दोन शेर आवडले.
मुले पाहती..
किती प्याल हो?
जरी भांडता,
तरी याल हो..!
अजय अनंत जोशी
सोम, 02/02/2009 - 22:32
Permalink
आवडले
कासव, मुले, भांडण आवडले.
काही सरळ विधाने वाटली. असो.
कलोअ चूभूद्याघ्या