आम्ही तहात गेलो!
आम्ही भयात गेलो,
पुन्हा तहात गेलो
पडलो गरीब आम्ही!
त्याच्या खिशात गेलो
कंटाळुनी नशेला,
मग मी मठात गेलो
का प्रीत ही मिळाली?
..मी विस्तवात गेलो!
होती स्वतंत्र वाणी..
..कारागृहात गेलो.
वा!..धैर्य शोधण्याला,
त्याच्या मिशात गेलो
मी कौरवात नव्हतो..
का रौरवात गेलो?
नव्हती कुठेच शांती..
..मग भारतात गेलो
-मानस६
प्रतिसाद
भूषण कटककर
बुध, 28/01/2009 - 17:05
Permalink
मानससाहेब,
मानससाहेब,
मतल्यात पुन्हा या शब्दामुळे काहीतरी गडबद वाटत आहे. माझे चूक असल्यास कृपया सांगावेत.
छान वाटले गझलेतील विचार!
अजय अनंत जोशी
बुध, 28/01/2009 - 17:58
Permalink
मग भारतात गेलो..
छान.
मात्र मतल्याच्या दुसर्या ओळीत 'पुन्हा' हा शब्द ' ल गा ' असा न घेता 'पुन्न्हा' - 'गा गा' असा घ्यावा लागतो आहे.
कलोअ चूभूद्याघ्या
गौतमी
गुरु, 29/01/2009 - 10:03
Permalink
भारतात गेलो.
भारतात गेलो वाचून गंमत वाटली.