अशी वेळ आणू नको
मी जिंकताना तुला हारवावे अशी वेळ आणू नको
मी जिंकल्याचे तुला ना कळावे अशी वेळ आणू नको
आता कुठे होत आहे सुरू रात, बेहोष व्हावेस तू
ओल्या पहाटे तुला भान यावे अशी वेळ आणू नको
लाजून थोडी जरा दूर होता तुला आवरेनास तू
त्याच्यापुढे मी तुला लाजवावे अशी वेळ आणू नको
रोमात गंधीत आव्हान पाहून वाहून जाशील तू
तालात माझ्या तुला नाचवावे अशी वेळ आणू नको
जाणीव नाही कुणाला कशाची तिथे मी तुला नेतसे
माझे तुझे वेगळे जाणवावे अशी वेळ आणू नको
गझल:
प्रतिसाद
दशरथयादव
शुक्र, 23/01/2009 - 14:31
Permalink
वा..वा..छान
वा..वा..छानच..
शेर.. आवडला..
लाजून थोडी जरा दूर होता तुला आवरेनास तू
त्याच्यापुढे मी तुला लाजवावे अशी वेळ आणू नको
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 23/01/2009 - 17:00
Permalink
छान
लाजून थोडी जरा दूर होता तुला आवरेनास तू
त्याच्यापुढे मी तुला लाजवावे अशी वेळ आणू नको
जाणीव नाही कुणाला कशाची तिथे मी तुला नेतसे
माझे तुझे वेगळे जाणवावे अशी वेळ आणू नको
मीटर मजेशीर आहे, खूप चांगले सांभाळलेय.
शुभेच्छा
अजय अनंत जोशी
शुक्र, 23/01/2009 - 18:46
Permalink
चांगले विचार
विचार चांगले आहेत. पण मीटरमध्ये बसविल्यासारखे वाटत आहेत.
लाजून थोडी जरा दूर होता तुला आवरेनास तू
त्याच्यापुढे मी तुला लाजवावे अशी वेळ आणू नको
हे छान.
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
शनि, 24/01/2009 - 11:14
Permalink
मत!
सन्माननीय गौतमी,
आपली वातावरण निर्मीती चांगली आहे मात्र विषयाची हाताळणी मला फारशी भावली नाही.
सर्व शेरांमधे बेसिकली एकच मुद्दा सांगीतल्यासारखे वाटले.
धन्यवाद!
ग. वि. मिटके
शनि, 24/01/2009 - 12:52
Permalink
छान ....!!!
छान ....!!!
प्रदीप गांधलीकर
शनि, 24/01/2009 - 17:54
Permalink
छान !
सर्व शेर छान आहेत.
गौतमी
रवि, 25/01/2009 - 18:26
Permalink
आभार
सगळ्यांचेच खूप खूप आभार!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रवि, 25/01/2009 - 20:50
Permalink
मस्त !
आवडली गझल !