हॉटेल पॅराडाइज, पुणे. दि. १९.०१.०९ रात्री ११.३०
पाहणे लाजून खाली अन कसेसे हासणे
विसर पुर्वी जाहलेले, सोड परके भासणे
काय ही मागासण्याध्ये पुढाकारी तुझी?
की पुढाकारीच माझी त्यामुळे मागासणे
मी तुझ्यासाठी न आलो, माझियासाठी न तू
काय मी आ वासणे अन काय तूही त्रासणे
वाचला मसुदा तरीही घेतले कंत्राट मी
मी तुला आरासणे अन तू तुला जोपासणे
"घ्या चहा" बोलून बाकी पाहणे शुन्यामधे
हे दहा रुपयात म्हणजे फक्त पैसे नासणे
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
बुध, 21/01/2009 - 11:48
Permalink
मी तुझ्यासाठी न आलो
मी तुझ्यासाठी न आलो, माझियासाठी न तू
काय मी आ वासणे अन काय तूही त्रासणे वा! 'आ' असे करा.
पाहणे लाजून खाली अन कसेसे हासणे
विसर पुर्वी जाहलेले, सोड परके भासणे ठीक
वाचला मसुदा तरीही घेतले कंत्राट मी
मी तुला आरासणे अन तू तुला जोपासणे सम्दिग्ध
"घ्या चहा" बोलून बाकी पाहणे शुन्यामधे
हे दहा रुपयात म्हणजे फक्त पैसे नासणे कॉफी तरी घ्यायची...
काय ही मागासण्याध्ये पुढाकारी तुझी?
की पुढाकारीच माझी त्यामुळे मागासणे 'मागासण्यामध्ये' असे करा
कलोअ चूभूद्याघ्या
गझलग्रस्त
बुध, 21/01/2009 - 17:56
Permalink
काय हे?
हल्ली नवगझलकारांना स्थलकालाचे बरेच भान येऊ लागलेय असे दिसतेय!
पाहणे लाजून खाली अन कसेसे हासणेत्याशिवाय का असा हॉटेलबिटेलाचा उल्लेख करून , वाचणा-यांना स्थलकालाची सफर घडवून आणण्याचा खटाटोप केला आहे!
असो. स्थलकालाच उल्लेख करण्याला आमचा काही आक्षेप नाही.पण गझलेपेक्षा हॉटेलच जास्तडोळ्यांसमोर आले. हॉटेलच्या परिसरात गझल कुठे सापडते का ह्याचा आम्ही बराच शोध केला पण आम्हाला काहीच सापडले नाही.
एक पहिला शेर सोडला तर काहीच 'वा' सण्यासारखे नाही ह्या 'गझले'त.
विसर पुर्वी जाहलेले, सोड परके भासणे -छान आहे. जमलाय. पण मतल्यात असावा तसा जोर नाही ह्या शेरात. 'लाजून खाली ती पाहतेआणि उगाच हसून मला ती परकी असल्याचे भासते' ह्यात काय नवीन? पण वाचायला तरी बरा आहे.
काय ही मागासण्याध्ये पुढाकारी तुझी?
की पुढाकारीच माझी त्यामुळे मागासणे
- म्हणजे काय? 'मागासण्याध्ये' हे ''मागासण्यामध्ये' आहे इतपत समजले. 'तूझ्या अतिमागासण्यामुळे माझी पुढाकारी (राजकीय?) ही मागासली आहे' असा अर्थ आम्हाला लागला आहे. पण ह्यामध्ये काही अर्थकारणीय राजकारण आहे का? खुलासा व्हावा.
मी तुझ्यासाठी न आलो, माझियासाठी न तू
काय मी आ वासणे अन काय तूही त्रासणे '- कोणीच कोणासाठी आले नाही तर उगाच 'आ' कशाला 'वा'सलात? एकाने 'आ' वासून दुस-याला त्रास होणे म्हणजे हे दंतमंजनाच्या जाहीरातीतच बघायला शक्य होते.
वाचला मसुदा तरीही घेतले कंत्राट मी
मी तुला आरासणे अन तू तुला जोपासणे-पहिली ओळ वाचून छान वाटले. पण दुस-या ओळीत गाडी रूळ सोडून भलतीकडेच गेली. का?
"घ्या चहा" बोलून बाकी पाहणे शुन्यामधे
हे दहा रुपयात म्हणजे फक्त पैसे नासणे- पॅराडाईज हॉटेलामध्ये चहा इतका काही महाग नाही एवढा एकच अर्थ आम्हाला ह्यातून लागला. कदाचित 'दहा' रूपयात कवीच्या अपेक्षा ब-याच होत्या, पण 'च्यायला !एवढा दहा रूपयाचा चहा पाजूनही परकेपणाच! '
मिळालेली मानसिक ओढाताण मांडली गेली आहे का? दहा रूपयात एक कप की दोन कप हे सुद्धा कळाले नाही. खुलासा झाल्यास आम्हालाही दहा रूपयाचा चहा प्यावासा वाटेल.
कळावे,
आपला त्रस्त,
गझलग्रस्त.
भूषण कटककर
गुरु, 22/01/2009 - 10:35
Permalink
जबरदस्त
हा हा हा हा ! श्री गझलग्रस्त, जबरदस्त प्रतिसाद!
खरंच, आपण या तथाकथित गझलेतील त्रुटी बरोब्बर दाखवल्यात.
दंतमंजन सॉलीडच!
दहा रुपयात दोन कप होता चहा. परतही जायला आवडेल मला. पण यावेळेस तिचे अन माझ्या चहाचे पैसे मी देणार!
( चुकून ४ वेळा आपला प्रतिसाद आला आहे त्याबाबतीत काहीतरी करावेत अशी विनंती! कारण माझ्या रचनांना एकदम एवढे प्रतिसाद पहायची माझी सवय नाही .... हा हा हा हा! )
काय ही मागासण्याध्ये पुढाकारी तुझी?
की पुढाकारीच माझी त्यामुळे मागासणे - या शेराचा खुलासा!
ही भावनिक पुढाकारी अन मानसिक मागासलेपण आहे. मी पुर्वीचे सारे विसरून पुन्हा तिच्यापुढे हस्तांदोलनासाठी हात करतोय अन ती फक्त माझा अपमान होऊ नये म्हणुन कसातरी हात हातात देतीय. शेर जमला नाहीये हे मात्र खरे आहे.
आपण प्रतिसाद देताना शैलीमधे जरा बदल करायला हवे होतेत असे उगाच वाटले. ( पहा: मी नवगझलकार आहे हे आपल्याला माहीत असणे याचेच निदर्शक वाटते. )
माझ्यामते स्थलकालाचे भान असलेल्या गझला वास्तव असतात, पण तशी कदाचित ही रचना झाली नसावी. आपल्याला ही रचना पाहून मजा आली नाही यासाठी माफ करा. मला मात्र त्यादिवशी तिला भेटुन फार मजा आली. अजून तो प्रसंग मनातुन जात नाही.
आणखीन एक शेर तिच्यासाठी:
एक हस्तांदोलनाने धन्य झालो मी तुझ्या
जे तुझ्यासाठी असे बस हात हाती घासणे
अर्चना लाळे
गुरु, 22/01/2009 - 11:03
Permalink
फालतूपणा
ही गझल की काय त्याचे नाव देण्याची पद्धत वगैरे आणि कोण गझलग्रस्त यांचा प्रतिसाद सर्व फालतूपणाच वाटतो. गझलेचे नाव सोडले तर २-४ ओळी चांगल्या वटताहेत.
एक सूचना केली तर चालेल का? आम्ही या साईटवर उत्तम काही मिळेल या अपेक्षेने येतो. तिथे असा फालतूपणा कशाला?
४-४ वेळा तोच प्रतिसाद देण्याने कोणती हुशारी? साईट सांभाळणार्यांनी याचा विचर करावा.
मी मात्र यातील चांगले पाहते.
पाहणे लाजून खाली अन कसेसे हासणे
विसर पुर्वी जाहलेले, सोड परके भासणे
हे मलाही पटले.
भूषण कटककर
शुक्र, 23/01/2009 - 09:48
Permalink
फालतूपणा!
सन्माननीय अर्चनाजी,
माझ्या तथाकथित क्षुल्लक रचनेच्या पोरकटपणामुळे आपल्याला आनंद मिळू शकला नाही याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. श्री गझलग्रस्त यांचा प्रतिसाद चुकून ४ वेळा आला तो आता एकदाच दिसत आहे, तेव्हा तोही प्रॉब्लेम सुटला.
मात्र, एक विनंती, माझ्या रचनांवरून या साईटबाबतचे जजमेंट कृपया घेऊ नयेत. या साईटवर उत्तमोत्तम गझल आहेत हे सगळ्यांनाच ठाउक आहे.
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद व एक दोन ओळी आपल्यालाही आवडल्या हे वाचून खरच आनंद झाला.
आपल्या माहितीसाठी - ( अर्थात, आपल्याला ते माहीत नाही असे उगाचच गृहीत धरून मी लिहित आहे ) - मनावर प्रभाव टाकणार्या गोष्टी घडल्या की विविध माणसे विविध पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्यापैकी कवी हे कविता करतात. जी घटना या रचनेमधे आहे ती माझ्या मनावर प्रभाव टाकणारी होती. मी माझ्या सर्वात आवडणार्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीला भेटलो. त्याने माझ्या मनात जे आले त्यावर मी एक रचना केली. उत्स्फुर्तता हाही एक कवीचा गुण आहे असे माझे मत आहे. म्हणुनच माझ्यावर आरोप होतात की मी पाट्या टाकल्यासारख्या रचना करत बसतो. पण, माझ्या सर्व रचना या माझ्या मनाचे प्रतिबिंब आहेत. हे आपल्याला माझ्या 'तिलकधारी गप्प हो', 'ळ ची जुळवाजुळव', 'आणखी एक सपाट गझल','विनय का सोडलाहे मोगर्याने' या रचना वाचून पटायला हरकत नाही. तसेच माझ्या 'थोडासा', 'काय या छातीत श्वासाला मिळे' अन 'अलामत सोड चिंता तू' या रचनांवरून सुद्धा वाटावे.
असो. माझ्यामुळे निदान एकतरी 'फालतू' रचनाकार आहे हे काय कमी आहे का? सगळेच चांगले झाले तर प्रॉब्लेमच व्हायचा.
धन्यवाद!
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 23/01/2009 - 17:04
Permalink
व्वा
मी तुझ्यासाठी न आलो, माझियासाठी न तू
काय मी आ वासणे अन काय तूही त्रासणे