रजनीगंधा
रजनीगंधा उमलत जाता नव-वर्षाचा नाचे मोर
सरत्या वर्षा निरोप देउन निजे जुईची नाजुक पोर
वर्षे येती आणिक जाती तुम्ही वेगळे केले काय?
ज्याला -त्याला टोचुन पुसती बाभुळ आणी खट्याळ बोर
पुरे जाहल्या चो-या मा-या हा कंठा घे शेवटचाच
पुन्हा तेच ते प्रियेस सांगे भल्या पहाटे कोणी चोर
लेकुरवाळी कण्हेर यंदा मिळवायाचे म्हणते दाम
ठरवित बसते वेळापत्रक फुलण्याचेही काटे कोर
काटेरी जाळीवर हिरव्या करवंदांचे लोभस घोस
टपटपणारे जलद म्हणूकी नेत्र सई तव काळे भोर
गतवर्षांच्या पानांवरची फूंक सुनेत्रा हळूच धूळ
लिंबोणीच्या फांद्यांमधुनी दिसेल तुज बीजेची कोर
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
रवि, 18/01/2009 - 22:59
Permalink
चोर..
पुरे जाहल्या चो-या मा-या हा कंठा घे शेवटचाच
पुन्हा तेच ते प्रियेस सांगे भल्या पहाटे कोणी चोर
व्वा!
आणखी एक घ्या.
नसेल उघडत दार मनाचे नकोस लावू तूही जोर
नको करू तू उगा मनावर अत्याचारहि काही घोर
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
रवि, 18/01/2009 - 23:08
Permalink
लालित्य.
ठरवित बसते वेळापत्रक फुलण्याचेही काटे कोर
गतवर्षांच्या पानांवरची फूंक सुनेत्रा हळूच धूळ
या दोन ओळींमधील कल्पना अन वृत्ताचे लालित्य आवडले.
आपण माझ्यामते गझलेला एक वेगळाच रंग देत आहात. हे मत मी मागेही नोंदवले होते.
तिलकधारी
सोम, 19/01/2009 - 13:39
Permalink
नाही.
ही गझल नाही
प्रदीप गांधलीकर (not verified)
सोम, 19/01/2009 - 14:16
Permalink
सुं द र ग झ
सुं द र ग झ ल !
पुलस्ति
बुध, 21/01/2009 - 08:02
Permalink
वा वा!
कण्हेर आणि करवंदांच्या द्विपद्या फार फार छान आहेत!
लेकुरवाळी कण्हेर यंदा मिळवायाचे म्हणते दाम
ठरवित बसते वेळापत्रक फुलण्याचेही काटे कोर
काटेरी जाळीवर हिरव्या करवंदांचे लोभस घोस
टपटपणारे जलद म्हणूकी नेत्र सई तव काळे भोर
मस्तच कल्पना!!
अर्चना लाळे
गुरु, 22/01/2009 - 11:16
Permalink
कण्हेर चांगला आहे.
कण्हेर चांग्लाला आहे.
पण शेवटी पानांवरची धूळ फुंकल्याने फांद्या कशा काय मोकळ्या होतील? आणि कोर वगैरे दिसेल? पानांवरची धूळ उडवली तरी पाने जागच्या जगीच राहणार ना? जरी पाने थोडी हलली तरी फांद्या कशा हलतील कोर दिसायला? अतिशयोक्ती म्हटलेस तर ठीक आहे.
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 23/01/2009 - 17:13
Permalink
सुंदर
धन्यवाद
सुनेत्रा सुभाष
रवि, 25/01/2009 - 13:35
Permalink
धन्यवाद
आ.अजय, अर्चना, समीर,भूषण,प्रदीप, पुलस्ति,व आ.तिलकधारी,
मनापासून आभार.