मान्यवरांची गझल-संगीता जोशी
मुळीन न केला विचार तेव्हा
खुशाल केला करार तेव्हा
घडू नये ते घडून गेले
गुन्हे तसे दोन-चार तेव्हा
अशी कशी हारले , कळेना
न खेळताही जुगार , तेव्हा
जपून मी ठेविला मनाशी
दिलास जो तू नकार तेव्हा
मला खरे वाटलेहि होते
तुझे बहाणे हुशार तेव्हा
अता विचारू नका खुशाली
तुम्हीच केलेत वार तेव्हा
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
रवि, 18/01/2009 - 21:52
Permalink
नावीन्य
अता विचारू नका खुशाली
तुम्हीच केलेत वार तेव्हा
या आशयाचे शेर ( मित्रांनीच मारले, जे पोचवायला आले त्यांनीच मारले होते ) हे विचार आत्तापर्यंत भटांनंतर इतर गझलकारांनी मराठी गझलेत इतक्या वेळा आणले आहेत की त्यात नावीन्य आणणे हे अशक्य व्हावे.
साईटवर नावीन्ययुक्त विचारांना प्रशासनाकडुन स्तुतीचे दोन शब्द जाणीवपुर्वक यावेत, कुणी नवीन रसिकाने साईट बघितली तर इंटरेस्ट तरी वाटायला पाहिजे.
( मतल्यात पहिल्या ओळीत एक 'न' जास्त आला असावा असे वाटते आहे. )
अजय अनंत जोशी
रवि, 18/01/2009 - 22:26
Permalink
घडू नये ते घडून गेले
घडू नये ते घडून गेले
गुन्हे तसे दोन-चार तेव्हा
सोपे शब्द. चांगला अर्थ.
कलोअ चूभूद्याघ्या
तिलकधारी
सोम, 19/01/2009 - 13:55
Permalink
किरकोळ
किरकोळ रचना