मी मला बजावत होतो...
मी मला बजावत होतो! मी तुला विचारत होतो!
मी निघणार्या शंकांना वेळीच सोडवत होतो!
नियतीने माझी इतकी फरपट लिहिलेली होती..
जी माझी नव्हती, मी त्या, वाटेवर चालत होतो!
हा गुंता इतका झाला, ना वीण मला उलगडली
मी जोडुन माझी ठिगळे,मग मलाच उसवत होतो!
"तळपून दीसभर अंती, तव पदरी काय पडले रे?"
मी बुडणार्या सूर्याला हा प्रश्न विचारत होतो!
पाझर फुटण्या इतकाही ओलावा तुझ्यात नव्हता..
मी व्यर्थ शिळेवर माझे डोकेच आपटत होतो!
आतमध्ये कोठेशी का ठिणगी जिवंत होती?
येताच हवेचा झोका, मी पुन्हा फुलारत होतो!
मी गेलेल्या काळाची कधि पर्वा केली नाही..
पण येणार्या काळाचा मी रस्ता निरखत होतो!
नाजूक तुझ्या तळव्याला खुपतील पाकळ्या म्हणुनी
मी पायघड्या ह्रदयाच्या तुजपुढती पसरत होतो!
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
रवि, 18/01/2009 - 23:17
Permalink
परत तेच.
गझल चांगली आहेच. पण या गझलेत मला परत तोच प्रतिसाद द्यावासा वाटत आहे जो मी संगीता जोशी यांच्या मीर क्षीरसागर यांनी प्रकाशित केलेल्या गझलेवर दिला आहे.
विचारांमधे कुठेही नावीन्य दिसत नाही. नेहमी नेहमी काय नवीन लिहिणार असा प्रश्न कुणाला पडल्यास माझे उत्तर आहे की वृत्त, शब्दांची निवड, रदीफ, काफिया, प्रतिमांची निवड वगैरे काहीतरी वेगळे घ्यावे. माफ करा, मला कुठेही असे म्हणायचे नाही की 'अनुकरण' आहे असे मला वाटते आहे, पण या गझलेतील दोन शेरातील विचार मी प्रदीप कुलकर्णी यांच्या गझलांमधे तसेच किंवा थोड्याश्या साधर्म्यासहित वाचले आहेत.
पाझर फुटण्या इतकाही ओलावा तुझ्यात नव्हता..
मी व्यर्थ शिळेवर माझे डोकेच आपटत होतो!
आतमध्ये कोठेशी का ठिणगी जिवंत होती?
येताच हवेचा झोका, मी पुन्हा फुलारत होतो!
मागे एकदा एक संवाद झाला होता. भारदस्त गझलकार अनंत ढवळे यांनी संतोष कुलकर्णींना एक प्रश्न विचारला होता ( प्रतिसादाच्या स्वरुपात ) तो या साईटवर आहे.
" आपण किती वर्षे कळ्यांना अन फुलांना झोडपणार?"
त्याची मला इथे आठवण झाली.
अजय अनंत जोशी
रवि, 18/01/2009 - 23:37
Permalink
नाविन्य???
प्रिय मधुघट,
कवी म्हणून मी सर्वांचाच आदर करतो. कवीला जे दिसते ते कवी लिहितो. यात श्रेष्ठ - कनिष्ठ असे काही मी मानत नाही. तरीही आपण कोणाची कॉपी करीत नाही ना? किंवा कित्ता गिरवित नाही ना? हे पहायला हवे असे मला वाटते.
विचारांमध्ये नाविन्य असावे की नसावे याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही. शेकडो वर्षांच्या कवितेच्या प्रवासानंतर आपण काय नवीन सांगणार? हां, मात्र दाखले नवीन देऊ शकतो यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. अर्थात, हे कवीची प्रतिभा आणि अभ्यास यावर अवलंबून असते. ते हळूहळूच होते असे मला वाटते.
बाकी निर्णय कवीचाच.
भूषण : नाहितरी कुणाकडे पाहूनच आपण लिहितो ना!
मधुघट,
मी एक बदल सुचवू का?
पाझर फुटण्या इतकाही ओलावा तुझ्यात नव्हता..
मी व्यर्थ शिळेवर माझे डोकेच आपटत होतो! दुस-या ओळीत....
व्यर्थ शिळेवर माझे डोके उगा आपटत होतो! हे कसे वाटते?
कलोअ चूभूद्याघ्या
तिलकधारी
सोम, 19/01/2009 - 13:48
Permalink
टाकणे टाकत होतो
उठायचे अन टाकायची करुन गझल असे करू नये.
त्याला काहीतरी अर्थ, काही संदर्भ असला पाहिजे.
मधुघट
गुरु, 22/01/2009 - 19:44
Permalink
भूषणजी
भूषणजी धन्यवाद!
अजयजी ,
'व्यर्थ' म्हणजेच 'उगा'! आणि बदलामुळे लयही बिघडते! धन्यवाद!
तिलकधारी
आपण कितव्या इयत्तेत शिकता?