तुझा चेहरा

तुझा चेहरा
आस लागली जिवास माझ्या केव्हा दिसेल तुझा चेहरा
विरहाचा  दुष्काळ  संपता कसा  उमलेल तुझा चेहरा..

ऋतू आगळे, फुले वेगळी , गंध तयांचा नवीन भासे......
मनात माझ्या आहे तैसा अजून असेल- तुझा चेहरा..?

कशास करतो तू ही चर्चा व्यर्थ हवापाण्याची आता?
टाळशील तू  काही  ..तेही  मला कळवेल तुझा चेहरा...

अपूर्ण आहे कविता म्हणून तुला टाळले जरी कितीदा ..
खात्री होती मनासारखी ओळ सुचवेल तुझा चेहरा..

तुला पाहता, वारा चळला, मेघ बरसले, कळ्या उमलल्या
उरेल का मज भान जगाचे ..जेव्हा दिसेल तुझा चेहरा..

.....................................................................
हा उंबरठा, कोयंडा अन् कुलुपे होती  जागोजागी
तरी राहिला स्वतंत्र - आता जगास नडेल तुझा चेहरा...

शोधुन आलो ,कड्या कपारी ,डोंगर दर्या, आसमंत मी सारा..
(मिळेल का मज ऐसे काही-  ज्याने खुलेल तुझा चेहरा ?)

-सोनाली जोशी

गझल: 

प्रतिसाद

सोनाली,
तुझे.् हे तीनही शेर  मनापासून आवडले....
खूपच छान.......

ऋतू आगळे, फुले वेगळी , गंध तयांचा नवीन भासे......
मनात माझ्या आहे तैसा अजून असेल- तुझा चेहरा..?

कशास करतो तू ही चर्चा व्यर्थ हवापाण्याची आता?
टाळशील तू  काही  ..तेही  मला कळवेल तुझा चेहरा...अपूर्ण आहे कविता म्हणून तुला टाळले जरी कितीदा ..
खात्री होती मनासारखी ओळ सुचवेल तुझा चेहरा..

अपूर्ण आहे कविता म्हणून तुला टाळले जरी कितीदा ..
खात्री होती मनासारखी ओळ सुचवेल तुझा चेहरा..

तुला पाहता, वारा चळला, मेघ बरसले, कळ्या उमलल्या
उरेल का मज भान जगाचे ..जेव्हा दिसेल तुझा चेहरा..

.....................................................................
हा उंबरठा, कोयंडा अन् कुलुपे होती  जागोजागी
तरी राहिला स्वतंत्र - आता जगास नडेल तुझा चेहरा...

शोधुन आलो ,कड्या कपारी ,डोंगर दर्या, आसमंत मी सारा..
(मिळेल का मज ऐसे काही-  ज्याने खुलेल तुझा चेहरा ?)
खूप  आवडले  शेर

फारच सुरेख........
कशास करतो तू ही चर्चा व्यर्थ हवापाण्याची आता?
टाळशील तू  काही  ..तेही  मला कळवेल तुझा चेहरा...
अपूर्ण आहे कविता म्हणून तुला टाळले जरी कितीदा ..
खात्री होती मनासारखी ओळ सुचवेल तुझा चेहरा..

कशास करतो तू ही चर्चा व्यर्थ हवापाण्याची आता?
टाळशील तू  काही  ..तेही  मला कळवेल तुझा चेहरा...
सगळी गझल छान आहे, त्यातही हा शेर खूप आवडला

कशास करतो तू ही चर्चा व्यर्थ हवापाण्याची आता?

ही ओळ अशुद्ध आहे.
अपूर्ण आहे कविता म्हणून तुला टाळले जरी कितीदा ..
खात्री होती मनासारखी ओळ सुचवेल तुझा चेहरा..
या शेरावरून प्रिय मित्र प्रदीपच्या या शेराची आठवण झाली.
चेहरा डोळ्यापुढे येतो तुझा
जे न सुचले, त्याच कडव्यासारखा..

गझल आवडली.
माफ करा, पण हे वृत्त कसे आहे ते समजले नाही. मला काही काही ओळी म्हणताना अडखळायला झाले. कदाचित ते मला माहीत नसावे. कुणीतरी सांगीतल्यास आभारी राहीन.
 
आस लागली जिवास माझ्या केव्हा दिसेल तुझा चेहरा
विरहाचा  दुष्काळ  संपता कसा  उमलेल तुझा चेहरा..
 कवीच्या जिवास आस लागली आहे की प्रियकराचा चेहरा कधी दिसेल. पण त्याच वेळेस उत्सुकता ही आहे की कवी तिच्या प्रियकराला दर्शन देईल तेव्हा प्रियकराचा चेहरा कसा उमलेल! सुंदर!

ऋतू आगळे, फुले वेगळी , गंध तयांचा नवीन भासे......
मनात माझ्या आहे तैसा अजून असेल- तुझा चेहरा..?
एक गझलेचा शेर! आपण भेटुन खूप दिवस झाले. अजूनही तू तसाच असशील का?सुंदर!

कशास करतो तू ही चर्चा व्यर्थ हवापाण्याची आता?
टाळशील तू  काही  ..तेही  मला कळवेल तुझा चेहरा...
फार छान! तू मला टाळायला बघशील तेव्हा कितीही साखरपेरणी केलीस तरी कळेलच मला!

अपूर्ण आहे कविता म्हणून तुला टाळले जरी कितीदा ..
खात्री होती मनासारखी ओळ सुचवेल तुझा चेहरा..
चांगला शेर!

तुला पाहता, वारा चळला, मेघ बरसले, कळ्या उमलल्या
उरेल का मज भान जगाचे ..जेव्हा दिसेल तुझा चेहरा..
अनावश्यक शेर! निसर्गवर्णन!

.....................................................................
हा उंबरठा, कोयंडा अन् कुलुपे होती  जागोजागी
तरी राहिला स्वतंत्र - आता जगास नडेल तुझा चेहरा...
असंबद्ध शेर!

शोधुन आलो ,कड्या कपारी ,डोंगर दर्या, आसमंत मी सारा..
(मिळेल का मज ऐसे काही-  ज्याने खुलेल तुझा चेहरा ?)
गैरसमज! बहुतेक आमचा गैरसमज झाला आहे. 'शोधुन आलो' मधे या स्त्री कवीने पुरुषाच्या तोंडी ही रचना केली आहे काय? की शोधुन आले म्हणायचे होते? हाही एक असंबद्ध अन अनावश्यक शेर आहे.

सुधारणेला वाव आहे.