ओळख
सखे तुला मी वाटत नाही आज नेहमीचा?
खरखुरा माझ्याच कुठेसा मीच ओळखीचा?
अजून थोडा शिल्लक आहे श्वास एकट्याला
कशास मी अर्ध्यातच सोडू मार्ग सावलीचा?
पिसाटलेले वादळवारे साद घालणारे
जपून जा तू जोवर मागे प्रश्न काळजीचा
दशावतारी खेळ कशाला राजकारण्यांचे?
विकून टाका एकमुखाने देश वाटणीचा
किती पखाली वाहत राहू हे विचार ओझे?
परंपरेने चालत आला मान पालखीचा
'महाग झाले जीवन येथे'बातमीच खोटी
तुफान गर्दी पाहत होती खेळ आवडीचा
गझल:
प्रतिसाद
तिलकधारी
शनि, 17/01/2009 - 11:01
Permalink
अभाव!
गझलियतचा अभाव!
भूषण कटककर
शनि, 17/01/2009 - 11:35
Permalink
देश वाटणीचा
देश वाटणीचा उत्तम शेर आहे.
सगळीच गझल आवडली.
धन्यवाद!