नवीन नाही
मला आजचे तुझे वागणे नवीन नाही
तुझे बहाणे,तुझी कारणे नवीन नाही
भरू लागले कसे काय एवढ्यात डोळे?
मुक्या वेदना अशा पोचणे नवीन नाही
लिहिलेस ना विचारून तू मलाच सारे?
तुझे नेमके मला गाळणे नवीन नाही
पुढे वाढवू कशी सांग मी उगाच नाती
स्वतःशीच हे पुन्हा मोडणे नवीन नाही
किती पाहतो निसर्गास मी उदासवाणा!
फुलांनी बळे बळे लाजणे नवीन नाही
तुझ्यावाटचे हरेनात का कुणी बिचारे
मना सज्जना,पुढे चालणे नवीन नाही
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
गुरु, 15/01/2009 - 18:45
Permalink
मना सज्जना.......
लिहिलेस ना विचारून तू मलाच सारे?
(या ओळीत कृपया बदल करावात. मतप्रदर्शनाबद्द्ल माफ करा. माझेच मत चुकत असल्यास अवश्य कळवा. )
मना सज्जना शेर अतिशयच आवडला.
सगळीच गझल उत्तम आहे.
धन्यवाद!
सुनेत्रा सुभाष
शुक्र, 16/01/2009 - 10:18
Permalink
आवडलेले शेर
मला आजचे तुझे वागणे नवीन नाही
तुझे बहाणे,तुझी कारणे नवीन नाही
भरू लागले कसे काय एवढ्यात डोळे?
मुक्या वेदना अशा पोचणे नवीन नाही
लिहिलेस ना विचारून तू मलाच सारे?
तुझे नेमके मला गाळणे नवीन नाही
तिलकधारी
शनि, 17/01/2009 - 10:59
Permalink
विनाअर्थही रदीफ येणे नवीन नाही
भरू लागले कसे काय एवढ्यात डोळे?
मुक्या वेदना अशा पोचणे नवीन नाही
पुढे वाढवू कशी सांग मी उगाच नाती
स्वतःशीच हे पुन्हा मोडणे नवीन नाही
या दोन शेरांमध्ये रदीफ उगाच आहे.
योगेश वैद्य
शनि, 17/01/2009 - 14:51
Permalink
होय
लिहीलेस असेच हवे,चुकीने-ह्स्व लिहीला.
तिलकधारी
गुरु, 05/02/2009 - 15:07
Permalink
स्पष्टीकरण
'रदीफ उगाच' या प्रतिसादाचे स्पष्टीकरण.
भरू लागले कसे काय एवढ्यात डोळे?
मुक्या वेदना अशा पोचणे नवीन नाही
डोळे एवढ्यात कसे काय भरू लागले याचा अर्थ असा होतो की अजून तर बरेच सोसायचे आहे, इतक्यात कसा धीर सुटला? मुक्या वेदना अशा पोचणे याचा अर्थ होतो की काहीही न बोलता फक डोळे भरू लागले आहेत या माध्यमातून वेदना पोहोचल्या. समजा वेदना अशा पोहोचणे हे नवीन नसले तर डोळे एवढ्यात भरू लागले याचे आश्चर्य वाटायलाच नको. अशा पद्धतीने इथे 'नवीन नाही' हे गैरलागू ठरत आहे.
पुढे वाढवू कशी सांग मी उगाच नाती
स्वतःशीच हे पुन्हा मोडणे नवीन नाही
पुढे नाती कशाला वाढवू या प्रश्नातून असा अर्थ निघतो की नात्यांमुळे इतका त्रास झालेला आहे की आता नवीन नाती निर्माण करण्याताला रसच गेलेला आहे किंवा त्याची भीती बसली आहे. त्यानंतर स्वतःशीच हे पुन्हा मोडणे नवीन नाही मधून असा अर्थ निघतो की मी माझ्याशी माझ्या असलेल्या नात्यामुळे स्वतःच मोडतो. म्हणजे मला मीच इतका नकोसा होतो की मी स्वतःला पाहून मोडतो. इथे नवीन नाही या रदीफचा पहिल्या ओळीशी संबंध राहत नाही. समजा दुसर्या ओळीचा अर्थ असा घेतला की नात्यांमुळे मी स्वतः मोडतो, तर नवीन नाही या रदीफची भूमिका पातळ होते. पुन्हा जोडणे पुन्हा मोडणे नवीन नाही असे म्हंटले तर पहिल्या ओळीशी संबंध ठळक होईल. स्वतःशीच हे पुन्हा मोडणे नवीन नाही ही ओळ कायम ठेवायची असल्यास पहिली ओळ 'पुन्हा कशाला मला सावरू उगाच आता' अशी घेतल्यास दुसरी ओळ उचित ठरेल.