जसे काल होते तसे आज वाटे

रित्या मंदिरी चाळ - पखवाज वाटे
तिथे तुणतुणेही अता झांज वाटे


मिळे दाद नृत्यांस वा! व्वा!! फुकाची..
न तोडा, न ठसका, न तो बाज वाटे


कुण्या गावचा मीच माजी भिकारी
तरीही उगा द्यायची लाज वाटे


असे काळजाचे सदा होत तुकडे
प्रिया 'होय' म्हणताच कोलाज वाटे


नको दाखवू नवनवे रोज काही
जसे काल होते तसे आज वाटे


जिथे भाषणालाच बंदी असे, पण...
तरीही तयांचेच ते राज वाटे


कुणी घेत उचलून डोई सुखाला
इथे वेदनेचाच सरताज वाटे

गझल: 

प्रतिसाद

कुण्या गावचा मीच माजी भिकारी
तरीही उगा द्यायची लाज वाटे
माजी भिकारी संकल्पना आवडली. हा हा हा हा! माजी भिकारी! काय शब्दरचना आहे!
माजी अध्यक्ष, माजी संचालक वगैरे ऐकले होते.
आपण या रचनेला 'हझल' म्हणायला पाहिजे होतेत.
 

नृत्य, भाषण आणि वेदना आवडले.
कोलाज म्हणजे काय?

कोलाज वाला  शेर  आवडला.

भूषण,
मी ज्याला हझल समजत होतो ती फझल (फसलेली हझल) निघाली असे मत आहे. आता याला काय म्हणावे कोण जाणे? तरी...
भूषण, श्रीनिवास, सुनेत्रा - प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या

रित्या मंदिरी चाळ - पखवाज वाटे
तिथे तुणतुणेही अता झांज वाटे


कुणी घेत उचलून डोई सुखाला
इथे वेदनेचाच सरताज वाटे
मस्त!