दारू - प्रसाद कुलकर्णी
देऊनही मला ही देणार काय दारू ?
मस्तीत मीच माझ्या चढणार काय दारू ?
फेकून देत प्याला मी हा विचार केला
काळीज फाटलेले शिवणार काय दारू ?
बेतास बात सारे जगणे जगून झाले
जगण्यात झिंग नाही , करणार काय दारू ?
ज्यांनी निदर्शनांनी दारूच बंद केली
ते शेवटी म्हणाले घेणार काय दारू ?
ज्यांचा परिस्थितीने गांजून जीव जातो,
त्यांची कधी तरी का सुटणार काय दारू ?
-प्रसाद कुलकर्णी
संग्रह- गझलांकित
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
मंगळ, 30/12/2008 - 20:32
Permalink
जगण्यात झिंग नाही...
वा प्रसाद वा...
जगण्यात झिंग नाही...करणार काय दारू? सुंदर अन दमदार ओळ. एकदम पंकज उधास आठवला.
मी 'मदिरा' या विषयावर अनेक शेर व कविता ( तेव्हा मी गझल करु शकायचो नाही, हल्ली हल्ली लोक म्हणतात, भूषण उभा राहिला आम्ही नाही पाहिला) केल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. जो विषय सारखा सारखा डोक्यात असतो तोच कवितेत उमटणार! त्यापैकी 'जाळून पीत आहे' मधील या ओळी आपल्याला आवडतील या अपेक्षेने देत आहे.
पाण्यास जीवनाची, उपमा उचीत नाही
किति काळ हा घसा मी, जाळून पीत आहे
अभ्यास लागतो रे, बदनाम व्हायलाही
प्रत्येक थेंब मित्रा, कोळून पीत आहे
जाते घशातुनी ती, डोळ्यामधून येते
अश्रूस गाल माझा, वाळून पीत आहे
मदिरा खराब आहे, जे सांगतात मजला
असल्या सुधारकांना, टाळून पीत आहे
माफ करा! फारच वाहवत गेलो. विषयच तसा आहे. आपली रचना आवडलीच!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंगळ, 30/12/2008 - 20:35
Permalink
आवडली गझल
मस्तच !!
कैलास
रवि, 21/03/2010 - 21:11
Permalink
व्वा...क्या बात है
व्वा...क्या बात है !!
डॉ.कैलास