असा मी असामी

दाती तृण धरून घेत गेली सपशेल शरणागती
मोहाच्या गनिमी लढ्यात मुकली देहास माझी मती


लाजे कोण, कुणी कवेत घेई, घेई उखाणे कुणी
चुंबे कोण, वडास कोण पुजते, भलतीच जाई सती


भानावर असता मला कधी जो भगवंत ना आठवे
प्याला मी गिळताच आठवावा, ही केवढी उन्नती !


कविता का करतो नका विचारू, प्रतिभा जरा ढापली
कर भरणे क्रमप्राप्त हो तयाचा, ज्याची नसे पावती


भेटू हे ठरवून फक्त मृत्यो, उपयोग काही नसे
पाउल टाक जरा भराभरा तू, की वाढवू मी गती?


अपूर्ण......

गझल: 

प्रतिसाद

छान. (अजून जमायला हवा होता.)
कलोअ चूभूद्याघ्या

शार्दुलविक्रीडित गझलेसाठी योग्य वृत्त ठरणे महाकर्मकठीण काम आहे.
बरे निभावलेस!

अजय,
थँक्स! मला जाणून घ्यायला आवडेल की शेवटचा शेर सुधारण्यासाठी मला काय करता येईल. आपली कल्पना सांगावीत.
पुन्हा धन्यवाद!