चल पुढे
जखम झाली, खूण झाली, रक्त आले? चल पुढे
समज नशिबी यायचे ते फक्त आले, चल पुढे
तिरुपतीच्या दर्शनावेळी तुला ढकले कुणी
मान की धनवान ज्यादा भक्त आले, चल पुढे
तू गझल करतोस अन जाहीरही करतोस ती?
वाटले होते तसे आसक्त आले, चल पुढे
पडु नको फंदात, त्यांची चुंबने बहकावती
सार बाजू गाल जे आरक्त आले, चल पुढे
हासणे हे काम आहे, हास तू, हसता रहा
लोचनी अश्रू जरी कंबक्त आले, चल पुढे
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
बुध, 10/12/2008 - 18:13
Permalink
दोन शेर-
जखम झाली, खूण झाली, रक्त आले? चल पुढे
समज नशिबी यायचे ते फक्त आले, चल पुढे
हासणे हे काम आहे, हास तू, हसता रहा
लोचनी अश्रू जरी कंबक्त आले, चल पुढे
हे दोन्ही शेर मस्त आहेत. अर्थात "कंबख्त"असा योग्य शब्द आहे, असे वाटते.
'तिरुपती'च्या उल्लेखामुळे तो शेर फारच 'स्पेसिफिक' झालाय. नुसते 'देवदर्शन' चालेल का? असा प्रश्न पडला.
Dhananjay Borde
बुध, 10/12/2008 - 18:29
Permalink
उम्दा!
रदीफ is electrifying! चल पुढे!! The peculiarity is that most of the shers depict the sad emotions/ incidences and in the last, the रदीफ, single handedly, gives a positive touch to every sher! This doubles the beauty, automatically..
पडु नको फंदात, त्यांची चुंबने बहकावती
सार बाजू गाल जे आरक्त आले, चल पुढे
हा भाव आवडला!