उपाय पाहिजे
का विचारशी उगाच काय पाहिजे?
जीवना मला तुझा उपाय पाहिजे
रोज मी नटेन, रोज पाहुनी मला
यायला तुझ्या मुखात हाय पाहिजे
कोण कोण माणसे दुरावली कुठे?
एकदा वळून ते बघाय पाहिजे
तापवी मनात दु:ख एक एक मी
या मनास यायलाच साय पाहिजे
संकटे तुझ्यामुळेच गौतमी मला
हे कळे, तरी तुझीच राय पाहिजे
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
बुध, 10/12/2008 - 11:39
Permalink
दुःखाची साय
तापवी मनात दु:ख एक एक मी
या मनास यायलाच साय पाहिजे
छान!
रसास्वादः
एक दृष्टिकोनः मनात दुःख तापवणे ही वेगळी कल्पना आहे. आयुष्यभर माणूस कसलेतरी दुःख बाळगून असतो. ते मनात मुरून मुरून त्याची मनाला सवय झालेली असते. केव्हातरी एखाद्या घटनेमुळे, एखाद्या माणसामुळे किंवा नकळत एखाद्या क्षणी गाफील राहण्यामुळे सुप्तावस्थेतील ते दुःख खूप वाढते, अगदी मनाच्या पृष्ठभागावर येऊन दाहक बनते, तो क्षण जाळून टाकते....
जाणारे क्षण त्यावर फुंकर मारतात आणि ते दुःख थंड होते. थंड झाले तरी त्या विचारांचा पापुद्रा
मनावर राहतोच. हीच ती साय...
दुसरा दृष्टिकोन ः सुप्तावस्थेतील दुःख वर येत नाही,किंबहुना दुःख सुप्त नाहीच. ते सदैव जागते, पेटते आहे आणि नव्या दिवसाबरोबर ते सदा पेटतेच राहत आहे, विझण्याची शक्यताच नाही. दररोजच दुःखाच्या ज्वाळा कविमन भोगत असल्यामुळे त्याची धगरुपी साय मनावर जमा होते... नव्हे, व्हायलाच पाहिजे. (तरच धगधगत्या कविमनाला अर्थ!)
समीर चव्हाण (not verified)
बुध, 10/12/2008 - 14:42
Permalink
नवीन कल्पना
तापवी मनात दु:ख एक एक मी
या मनास यायलाच साय पाहिजे
Dhananjay Borde
बुध, 10/12/2008 - 17:59
Permalink
रोज मी नटेन..
रोज मी नटेन, रोज पाहुनी मला
यायला तुझ्या मुखात हाय पाहिजे
वरील शेरात नावीन्य जाणवले. Can't recall a similar sher in Urdu ghazals too..of course, there are many that depict to lover landing in such a situation at the hands of his beloved's beauty but a sher depicting a woman making such a statement comes across with some degree of newness.
कोण कोण माणसे दुरावली कुठे?
एकदा वळून ते बघाय पाहिजे
The above sher is also nice.
संकटे तुझ्यामुळेच "गौतमी" मला
हे कळे, तरी तुझीच राय पाहिजे
The maqta is also good. Of course, राय is not a Marathi word but it jells well here and no one will find difficulty in understanding its meaning.
regards,
प्रसाद लिमये
गुरु, 11/12/2008 - 12:58
Permalink
रोज मी
रोज मी नटेन, रोज पाहुनी मला
यायला तुझ्या मुखात हाय पाहिजे
कोण कोण माणसे दुरावली कुठे?
एकदा वळून ते बघाय पाहिजे
तापवी मनात दु:ख एक एक मी
या मनास यायलाच साय पाहिजे
तिन्ही शेर आवडले
पण मला " कोण कोण माणसे....." जास्त आवडला. एक त्रयस्थ म्हणून असे वळून बघीतले तर खरेच काही चेहरे दिसतात
गौतमी
गुरु, 11/12/2008 - 15:29
Permalink
साय!
धन्यवाद केदार व समीर,
केदारने मांडलेले दोन्ही दृष्टीकोन अत्यंत छान वाटले. मला पहिल्या दृष्टीकोनातील विचार मनात असताना तो शेर सुचला होता.
दशरथयादव
शुक्र, 13/03/2009 - 21:46
Permalink
ंशेर
ंशेर आवडले.....
रोज मी नटेन, रोज पाहुनी मला
यायला तुझ्या मुखात हाय पाहिजे
कोण कोण माणसे दुरावली कुठे?
एकदा वळून ते बघाय पाहिजे
तापवी मनात दु:ख एक एक मी
या मनास यायलाच साय पाहिजे
अजय अनंत जोशी
शनि, 14/03/2009 - 10:22
Permalink
कोण कोण माणसे दुरावली कुठे?
कोण कोण माणसे दुरावली कुठे?
एकदा वळून ते बघाय पाहिजे निश्चितच.
कलोअ चूभूद्याघ्या