सांग ओठास तुझी गोष्ट फुलांची बाई


सांग ओठास तुझी गोष्ट फुलांची बाई
ओठ देतील मला भेट दवाची बाई

दोन घेण्यास कडू घोट कुणी ना येते
लाव  बोटे तव  काव्यास मधाची बाई

पाश तोडून  जुने घट्ट कशाला आलो?
ओढ  होतीचगं  ओढाळ जलाची बाई

बोलता मी   तव   नाका  मिरची का झोंबे
का  धरावी गुळणी मीच मिठाची बाई

सर्व  वाटून फुले हात तुला मी  देता
देव देईल खरी नीज  सुखाची  बाई

का  'सुनेत्रा' म्हणती  ते  रजनी  अंधारी?
शुभ्र गर्भात तिच्या प्रीत शिवाची बाई



गझल: 

प्रतिसाद

आपला वेग पाहून आम्ही थक्क झालो आहोत. या सर्व वाटचालीत आपण 'गझले'पासून दूर जाऊ नयेत अशी इच्छा! 'डोल सख्या रे' सारखा शेर रचणार्‍या आपण कविता  करू नयेत अशी इच्छा!.  काहीही तिरके न बोलता आम्ही आता अगदी सरळ सरळ बोलायचे ठरवले आहे.

सांग ओठास तुझी गोष्ट फुलांची बाई
ओठ देतील मला भेट दवाची बाई

आशयातील संदिग्धता!

दोन घेण्यास कडू घोट कुणीना येते
लाव  बोटे तव  काव्यास मधाची बाई

गालीबच्या 'चर्चेमधे' असलेल्या गझलेच्या वृत्तात आपण ही रचना रचली आहेत. कौन जीता है तेरे जुल्फ के सर होने तक! ही एक चांगली बाब आहे.

पाश तोडून  जुने घट्ट कशाला आलो?
ओढ  होतीचगं  ओढाळ जलाची बाई

बोलता मी   तव   नाका  मिरची का झोंबे
का  धरावी गुळणी मीच मिठाची बाई

सर्व  वाटून फुले हात तुला मी  देता
देव देईल खरी नीज  सुखाची  बाई

का  'सुनेत्रा' म्हणती  ते  रजनी  अंधारी?
शुभ्र गर्भात तिच्या प्रीत शिवाची बाई

या शेरामधे 'बाई' या शब्दाची किती ठिकाणि आवश्यकता आहे हे तपासावेत.

 

दोन घेण्यास कडू घोट कुणी ना येते
लाव  बोटे तव  काव्यास मधाची बाई
छान.
कलोअ चूभूद्याघ्या

मला काही समजले नाही... आपापल्या पालकदत्त नावांनी प्रतिसाद आले तर बरे होईल्..तिलकधारी काय, तिलकधारीकाका काय, ६४बिट्स काय, आजोबा काय .... हे काय सुरू आहे ???  वायफळ चर्चा आणि सुमार रचना..

मा.  गंभीर समीक्षक,
मतल्याच्या  आशयात  थोडी  संदिग्धता असेलही,
कारण  आपण सर्वचजण (म्हणजे गझलकार, वाचक, समीक्षक इत्यादी) सर्व दृष्टीने परिपूर्ण नसतोच. परिपूर्णतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपण करित असतो.
'बाई' या शब्दाची किती ठिकाणी आवश्यकता आहे ते मी जरूर तपासेन पण खरे तर यावर सर्वांनी मिळून थोडा विचार करावा लागेल. मुखवटे टाकून खर्‍या चेहर्‍याने पुढे यावे लागेल. मा़या एकटीला हे काम पेलेल असे वाटत नाही. तरी पण मी माझ्या कुवतीनुसार थोडाफार प्रयत्न करेन. आपण मला थोड वोळ द्यावा.
बाकी मोकळेपणाने बोललात याबद्दल धन्यवाद.
 
मा. अजय,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मागच्या 'कमळ नव्हे पण गुलाब' या रचनेवरील आपल्या प्रतिसादाला उत्तर देताना चुकुन आपले नाव मी मा. अनंत असे टाकले, त्याबद्दल क्षमस्व.

मा. अनंत ढवळे,
तुम्हाला काय समजले नाही तेही मला समजलेलं नाही.
'तिलकधारी, तिलकधारीकाका, ६४बिट्स, आजोबा' यांच्याविषयी च्या तुमच्या तक्रारी माझ्या गझलेच्या प्रतिसादात कशासाठी नोंदवलेल्या आहेत हे मला समजलेलं नाही. कारण 'सुनेत्रा सुभाष' हे माझे पालकदत्त नावच आहे आणि माझा वरील नावांशी काहीच संबंध नाही!
आणि राहिला प्रश्न वायफळ चर्चा आणि सुमार रचनेचा,
आपल्या दृष्टीने ही रचना सुमार असेल, किंवा खरोखरीच ही रचना सुमार असेलही, पण त्यावरील चर्चा निदान मला तरी वायफळ वाटत नाही! या चर्चेतूनच सुमार रचनांना सुधारण्यास वाव मिळतो. एखाद्या रचनेला सुमार म्हणून मोकळे होणार्‍यांपेक्षा त्यावर चर्चा (आपल्या दृष्टीने वायफळ चर्चा) करणारे लोकच सुमारातून सुंदर घडवू शकतात.
सुनेत्रा सुभाष.

सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
काही प्रमाणात आपले म्हणणे समजण्यासारखे आहे की अनंतरावांनी त्यांची ती व्यथा येथे मांडणे योग्य आहे की नाही याबद्दल आपल्याला हरकत असावी.
माझ्यामते एखाद्या गझलेवर प्रतिसाद येतात तेव्हा ते फक्त त्या गझलेवर असावेत किंवा फार तर त्या गझलेमुळे निघणार्‍या 'गझल बाबतीतल्या इतर विषयावर असावी, जसे तंत्र, मंत्र, इतर गझलांची योग्य उदाहरणे इत्यादी.
तेव्हा आपल्या या रचनेबाबत बोलायचे झाल्यास मुळात ही रचना गझल वाटत नाही व आपल्या गझलेत 'बाई' या शब्दाची किती आवश्यकता आहे यासाठी इतरांनी किंवा सर्वांनी मिळून कष्ट घ्यावेत असे व्यक्तिशः मला तरी वाटत नाही. आत्ताच प्रकाशित झालेली वैभव जोशी यांची 'दिशा गातात ह्या जेव्हा' ही गझल आपण वाचलीच असेल. त्या गझलेतला प्रत्येक शब्द काढून टाकण्याचा प्रयोग करून पहावात. त्याजागी दुसरा शब्द ओवण्याचा प्रयत्न करून पहावात. ते जर खूप अवघड असेल तर ते श्रेष्ठत्व समजायला हरकत नाही असे माझे मत आहे.
बघा:
दिशा गातात ह्या जेव्हा तुझ्या थाटात अंगाई
मला जाणीव होते की इथे नाहीस तू आई
यातील माझ्यामते फक्त 'ह्या' हा शब्द रिप्लेस करता येईल, त्या, ना वगैरे अशा अक्षरांनी. पण ते काही फारसे परिणामकारकपणे किंवा प्रभावीपणे करता येणार नाही. म्हणजे दिशा गातात ऐवजी दिशा म्हणतात वगैरे म्हणणे म्हणजे काही विशेष होणार नाही.
आपल्या न आवडणारा प्रतिसाद दिल्याबद्दल माफ करा. हा फक्त या रचनेबद्दलचा आहे. 

मा.  भूषण,
प्रतिसाद आवडला.

सांग ओठास तुझी गोष्ट फुलांची बाई - या वाक्याचा अर्थ समजल्यावर पुढची गझल वाचण्यात येईल.